Article on manohar parrikar written by atul tandalikar 
Blog | ब्लॉग

मनोहर पर्रीकर : आवडती प्रतिमा

अतुल क. तांदळीकर

आजकाल लोकांना आवडणाऱ्या प्रतिमांची खरोखरच वाणवा आहे. आदर्श व्यक्ती म्हणून प्रत्येक क्षेत्रात कुणी ना कुणी असतं, पण हा आदर्शवाद शाश्वत असतोच असं नाही. काळ झपाट्याने बदलतो आणि अशी व्यक्तिमत्त्व लोप पावतात. काही प्रतिमा मात्र कायम आवडत्या असतात. लाल बहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी अशी नावे त्यांच्या शत्रूंच्या तोंडीही आदराने येतात. मनोहर पर्रीकर हे नाव असंच आवडतं...

किती साधा माणूस, साधी राहणी, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविण्याचे सामर्थ्य. या गुणांवर पर्रीकरांनी या देशाची उत्तम सेवा केली. एका छोट्याशा राज्याचा मुख्यमंत्री ते देशाचा संरक्षण मंत्री आणि पुन्हा मृत्यशी दोन हात करीत राज्याच्या जनतेची अहोरात्र सेवा हा सगळा अलीकडच्या काळातील त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे!

हा प्रवास यासाठी महत्वाचा वाटतो की, आज पुढच्या पिढीसाठी अशा प्रेरणादायी लोकांचा आदर्श घेणे गरजेचे झाले आहे. केवळ प्रगती करताना पैसा कमवायचा आणि मोठा झाल्याचा आव आणायचा हे तंत्र घातक ठरत आहे. आज लोकांपुढे अशीच उदाहरणे देताना केवळ एखादेच पर्रीकर असतात, पण इतरांचे कर्तृत्व या पिढीसाठी कामाचे नसते. म्हणूनच लोकांमधील आवडत्या प्रतिमा निवडण्याची वेळ आली आहे. पर्रीकरांनी ही प्रतिमा कायम तेवत ठेवली. आपल्या संरक्षण मंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी देशाच्या सीमांवर अहोरात्र आपल्या जनतेसाठी जागणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढविले. राज्याचा लोकनेता म्हणून अहोरात्र जनसेवा केली. त्यांचे हे गुण नक्कीच प्रेरक आहेत. राजकारणाबद्दल सहसा तिटकारा व्यक्त होत असताना याच क्षेत्रात राहून लोकांचा आवडता बनलेल्या मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT