social-media
social-media 
Blog | ब्लॉग

समाजातलं स्टेटस हे सोशल मीडियावरच्या स्टेटसवर अवलंबून नसतं

योगेश कानगुडे

स्मार्ट फोनच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या मदतीने अवघे जग आपल्या मुठीत आल्यासारखे वाटते. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप, हाईक या सारख्या सोशल मीडिया साईटनीं प्रत्येकाला झपाटून टाकले आहे. सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स अँप यांचा बोलबाला आहे. दोन अनोळखी व्यक्ती भेटल्या कि हमखास विचारतात कि तू व्हाट्स अँपवर आहे का? स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे साऱ्या जगाशी कनेक्ट राहता येते, या आनंदनात सभोवतालच्या परिस्थीचे भान राहत नाही, हे वास्तव आहे. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे पुण्यातील चाकणमध्ये 14 वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली असून या हत्येचं कारणही चक्रावून टाकणारं आहे. अनिकेत शिंदे असं मृत मुलाचं नाव आहे.

अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपचा एक ग्रुप सुरु केला. पण काही दिवसांनी याच ग्रुपमधल्या मेंबर्समध्ये मतभेद सुरु झाले. एकमेकांना हिणवण्यासाठी आपले स्टेटस बदलण्याचा सिलसिला सुरु झाला एकाने ‘द किंग’ असा स्वतःचा स्टेटस ठेवला. तर त्याला शह देण्यासाठी दुसऱ्याने ‘आपणच बादशाह’ असा स्टेटस ठेवला. याच वादातून ग्रुपमधल्या एका सदस्याने अनिकेतला कुत्रा असे संबोधले आणि वाद विकोपाला गेला. याच वादातून चाकणच्या भुईकोट किल्ल्यात समोरासमोर येण्याचं ठरलं आणि तिथेच झटापट सुरु झाली. यातच एकाने अनिकेतला भोसकलं. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला झाला तर त्याच्यासोबत असलेल्या मित्र देखील गंभीर जखमी झाला. 

पालकांसाठी धोक्याची घंटा 
पण इतक्या किरकोळ कारणावरुन हत्या होत असेल, तर हे पालकांसाठीच नाही... तर समाजासाठी चिंतेची गोष्ट आहे.  पालकांनी काही विशिष्ट वयापर्यंत आपल्या मुलांना समाज माध्यमांपासून रोखण्याची आवश्यकता आहे. मुलांना समजावून सांगितले पाहिजे कि बाबा समाजातलं स्टेटस हे सोशल मीडियावरच्या स्टेटसवर अवलंबून नसतं. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. 

खरे तर सोशल मीडियाचा योग्य आणि नियंत्रित वापर केला तर त्याचा उपयोग तुमचे व्यक्‍तिमत्त्व घडवण्यासाठी करता येतो. स्वत:ला सांभाळून या माध्यमाचा उपयोग करायला हवा. प्रत्येक काळात असे एक माध्यम असते ज्याची सर्वांनाच भुरळ पडते; पण त्याचा वापर कसा करायचा आणि त्यात किती वाहवत जायचे हे ठरवायला हवे. संशोधनाअंती आलेली ही माध्यमे काही वाईटासाठी आलेली नाहीत. त्याचा वापर आपण कसा करतो ते महत्त्वाचे. यू-ट्युबवर खूप चांगले माहितीपट असतात. ते पाहायचे की नुसताच चावटपणा करायचा, हे आपण ठरवायला हवे. सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे दुष्परिणामही. या माध्यमात अंधारात राहून कोणावरही बाण चालवता येतो. कारण, इतर सर्व माध्यमांवर जबाबदारी आहे; पण सोशल मीडियावर नाही. पण निदान आलेल्या माहितीचा खरे-खोटेपणा पडताळण्याची खबरदारी तरी घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT