Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

Samantha Ruth Prabhu: समंथाचं शिक्षण सुरु असतानाच तिच्या घराची आर्थिक परिस्थिती खराब झाली, त्यावेळी त्यांच्याकडे जेवणाचे पैसे नव्हते. तिचं कुटूंब तिला शिकवूही शकत नव्हतं त्यामुळे तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.
एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास
Samantha Ruth Prabhuesakal

Samantha Ruth Prabhu: आज अभिनेत्री समंथा प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) वाढदिवस आहे. सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या समंथाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. साउथ सोबतच समंथाने बॉलिवूडमध्येही स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण या स्थानावर पोहोचण्यासाठी बराच स्ट्रगल केलाय. एक काळ असा होता की तिच्याकडे जेवण्यासाठी पैसेही नव्हते.

समांथा जन्म केरळ राज्यात झाला असून तिचे आई-वडील मल्याळी आहेत. तिचं मूळ नाव यशोदा असं आहे. तिचं बालपण आणि शिक्षण चैन्नई झालं. ती सगळ्यात लहान असून तिला दोन मोठे भाऊ आहेत ज्याची नाव जोनाथ आणि डेव्हिड अशी आहेत. तिचं शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती खराब झाली इतकी त्यांच्याकडे जेवणाचे पैसे नव्हते. तिचं कुटूंब तिला शिकवूही शकत नव्हतं त्यामुळे तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. याचवेळी रवी वर्मन यांनी तिला ये माया चेसावे या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली आणि या तेलगू सिनेमातून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं.

2009 साली आलेली ही तिची फिल्म सुपरहिट झाली. या सिनेमात तिने तिचा पूर्वाश्रमीचा नवरा नागा चैतन्यसोबत काम केलं होतं आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडली होती. त्यानाबतर तिने बऱ्याच सिनेमांमध्ये काम करत स्वतःची एक वेगळी ओळख बनवली.

याचदरम्यान तिने नागा चैतन्य सोबत लग्न केलं पण काही काळात त्यांचा घटस्फोट झाला. हे सगळं सुरू असतानाच तिला इम्युनिटी डिसऑर्डरशी संबधित आजार झाला. त्यामुळे अनेक मोठ्या प्रोजेक्टसवर तिला पाणी सोडावं लागलं.

एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यावर जीवापाड प्रेम केलं चूक झाली का? समंथानं बिनधास्तपणे सांगून टाकलं!

अमेरिकेत या आजारावर उपचार घेतल्यानंतर समांथाने शाकुंतलम या सिनेमातून दमदार कमबॅक केला. तिचा यशोदा हा सिनेमाही खूप गाजला होता तर फॅमिली मॅन 2 मध्ये तिने साकारलेली आंतकवादयाची निगेटिव्ह भूमिका सगळ्यांना आवडली होती. तर पुष्पा सिनेमातील तिचं 'उ अंटवावा' हे गाणंही सगळ्यांना खूप आवडलं. तर आता ती बंगारम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. नुकतंच तिने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com