mind
mind mind
Blog | ब्लॉग

मनाचा विमा कोठे मिळतो ?

सकाळ वृत्तसेवा

प्रियांका पाटील

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. या अरिष्टाच्या विळख्यात गेले वर्षभर आपण लॉक डाऊन एक, लॉक डाऊन दोन, लॉक डाऊन तीन अशा फेर्‍यातून गेलो.जनजीवन ठप्प झालं होतं. अजूनही बव्हंशी तसंच आहे.काळजीनं सगळे काळवंडले आहेत. कारण ही लाट गेल्यावर तिसरीचं भय कायम आहे. रुग्णांसाठी कमी पडणारी खाटांची संख्या, ऑक्सिजनचा तुटवडा, महागड्या रेमडेसिवीरसारख्या अ‍ाणि नंतर अनाठायी ठरलेल्या अौषधांसाठीची मारामार, हॉस्पिटल्सकडून आकारली गेलेली भरमसाठ बीलं आणि इतकं सगळं करूनही जीव वाचेल की नाही याची शाश्वती शून्य! हे सगळं आपण अनुभवलं आहे.

अनुभवांच्या या संचिताला अनेक पदर आहेत. रुग्णांची वाढती पॉझिटीव्हिटी लोकांच्या निगेटिव्हिटीचं कारण बनत आली. हे काय कमी काय म्हणून वृत्त वाहिन्यांचा उभा हैदोस सुरू झाला. स्मशानात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिवंत असणारांना मरण यातना भोगणं आलं. लॉकडाऊन मुळे बाजार ठप्प झाले. व्यवसाय ओस पडले. हातावर पोटं असणारांची दैना उडाली. मुलं चार भिंतीतल्या शाळांना पारखी झाली, त्याला पर्यायी सुविधा पुरवणं गोरगरिबांना दुष्काळात तेरावा महिना बनला आणि हाताची कामे सुटत गेलेले कामगार हवालदील झाले. कहर म्हणजे यात काही राजकारण्यांनी आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे उद्याेग केले. या सगळ्या आवर्तात सर्वसामान्य माणूस पिचला गेला आणि पिसलाही गेला.

जो शब्द पूर्वी सर्वंकष अर्थानं Positive मानला जात होता तो सपशेल negative बनला. अर्थात घरातल्या कुणाचा रिपोर्ट positive आला तर तो घरच्या इतरांनाच नव्हे तर शेजार, समाज, नातीगोती यांना निगेटिव्ह करू लागला. ऑनलाईन क्लासेस, work from home, सोशल डिस्टन्स, Sanitizer, मास्क, ऑक्सिजन पातळी हे शब्द परवलीचे झाले. नव्हे माणसे जिवंत असल्याचे ते पडताळे झाले. इम्युनिटी चांगली आहे ना? प्रोटीन्स वैगेरे घेताय ना? असे प्रश्न ख्यालीखुशाली विचारणारे गणले जाऊ लागले. मी सुदृढ आहे, बलदंड आहे, मला काहीही होणार नाही असं म्हणणार्‍यााचा तोरा गळून पडला. गरीब अभावग्रस्त असतात. त्यांच्याकडे उपचारासाठी पैशांचा प्रश्न असतो. पण कोराोनानं ही दरी समाप्त केली. आपल्याकडे पैसा आहे, महागडे उपचार घेऊ अशांचीही कोरोनानं गय केली नाही. काही अरिष्टे ही कोणेकांसाठी व्यवसायाची निष्पत्ती ठरतात. हे हेरून तुमच्या मागे तुमच्या बायका पोरांचं काय होणार ? असा बागुलबुवा उभा करून जाहिरातींचा सुळसुळाट झाला.

संरक्षण कवच असायलाच हवं. ज्यासाठी आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, त्याप्रती सजग असायलाच हवं. पण शरीराला बळकटी देणारी मानसिक स्थितीच जर थाऱ्यावर नसेल तर मग काय करायचं? मन का भी इन्शुरन्स होता कभी. साँसे चल रही है और मन की लाशे बिखरी पडी है इसके लिये ना कोई समशान है ना कोई कबरीस्तान! हे कानी पडताच मनात कितीतरी प्रश्न उफाळून येतात. ते मग डोक्यात घुमत राहतात. ज्या मनाच्या अवस्थेवर शरीराचा डोलारा उभा आहे त्या मनाची किंमत कोणत्याच बाजारात नाही. त्याच्यासाठी ना कोणता विमा आहे ना कोणतं संरक्षण कवच! मन आणि बुद्धी शरीराला तारत असते. उभारी देत असते. हे तंत्र बिघडलं तर? काहीही होऊ शकते. जीव पारखा होऊ शकतो. आत्महत्या करणारे शारीरिक नव्हे तर मानसिक सदृढ नसतात. वरवर पाहता लक्षातच येत नाही. पण मन जसं दिसत नाही तसं शरीर पाहूनही हे लक्षात येत नाही. मुळात आपल्या मनाची ‍अवस्था शरिराला राबवून घेत असते.

थोडक्यात ही पँडेमिक अवस्था असते. प्रत्येक जण मेंटल ट्रोमामधून जातोय असं हजारदा कानावर पडतं पण शारीरिक आजारांना वा अवस्थांना जितकं गांभीर्याने घेतले जाते तितकं मानसिक अवस्थेला आपण घेत नाही. का नाही घेत ? कारण तेवढा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही. मानसिक अवस्थेचा विचार करायचा असतो, हा विचारच अनेकांकडे नसतो. आणि त्यासाठी पैसे मोजणं? हे तर गावीही नसतं. मौज मजा करायला अर्थात शारिरीक सुखाकरिता आपण वर्षातून एकदा तरी आउट ऑफ इंडिया ट्रिप काढू, सुंदर दिसण्यासाठी आपल्याला ब्युटी पार्लर सलून हवीत, चारचौघांत उठून दिसण्यासाठी महागडे कपडे नि ज्वेलरी हवी. यात तडजोड नाही. आणि काही झालं तर विमा आहेच आपल्या मागच्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी. पण हा विचार करताना स्वतःच्या सुरक्षेचं काय?

स्वतःच्या मानसिक सौंदर्याचा विमा उतरवतो आपण कधी? नाहीच. बाजारात असा मनाचा विमा बिमा उपलब्ध नाही. मग तो कसा उतरवणार? उत्तर आहे. पण आपण त्याकडे कदाचित जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. वास्तवात समाजात अशी ब्युटी पार्लर्स आहेत. फक्त ती अनामिक आहेत. पण कोणताही अवयव नसलेल्या अर्थात वरकरणी न दिसणार्‍या या सेंटरकडे आपण गांभीर्याने पाहतच नाही. किंबहुना त्याचा बागुलबुवा होत नाही. "सारं काही मनावर अवलंबून असतं" अशी सुवचनं आपण दिवसातून हजार वेळा ऐकत असतो. तसं असूनही या सदृढ अवयवाकडे पहायला आपल्याकडे चोवीस तासातले चोवीस सेकंदही नसतात.

"मला मरावसं वाटतं!" हल्ली हे किती सहज बोललं जातं. पण हे बोलणं शरिराचं नव्हे मनाचं असते आणि बळी मात्र नाहकपणे शरीर जाते. मग आपण "कोणी मनाचा विमा देतं का विमा?" असं म्हणत ओरडत फिरायचं का? जगातले एकजात सगळे लोक मूर्ख आहेत, सारं काही आपल्यालाच कळते अशा अविर्भावात काळा कोट घालून माईकमध्ये बोलणार्‍यांचं हल्ली पेव फुटलं आहे. मग या बोलघेवड्यांचे कौन्सिलिंग सेशनच्या नावाखाली खिसे भरायचे का? असेही प्रश्न आपल्या मनात येतात. पण मला असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही असं म्हणत आपण या प्रश्नालाच उडवून लावतो आणि पुन्हा अस्वस्थ मानसिक विळख्यात स्वतःला अडकवून घेतो. पण खरंच असा मनाचा विमा मिळतो का म्हणून शोध घेत असताना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही अॉनलाइन साइटवर दिसले. ते ही विनामूल्य. त्यांनी कित्येकांच्या जीवनाला योग्य दिशा दिल्याचंही निदर्शनास आलं. सार हाच, मनाचा विमा उतरवणं आवश्यक झालं आहे. नव्हे ती सद्याच्या एकूण वातावरणात गरज झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT