Vaccinatiom
Vaccinatiom google
Blog | ब्लॉग

नाशिक-कसारा एसटी हुकली…

डॉ. राहुल रनाळकर

लसीकरणाच्या बाबतीत केंद्र सरकारचं नेमकं कसारा एसटीसारखं झालंय. घाईघाईत १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरणाची घोषणा झाली. केंद्रापाठोपाठ राज्यानेही त्यावर पाऊल ठेवलं. पण, ही घोषणा करताना आपली पहिली एसटी हुकली, याची कल्पना दोन्ही सरकारांना आली नाही.


नाशिकमधून मुंबईत नेहमी कामांसाठी जाणारी मंडळी आणि मुंबईत नोकरी करणाऱ्या नाशिककरांना येणारा अनुभव आणि लसीकरण मोहीम यांचा जवळचा संबंध आहे. प्रवासाचं नियोजन कोलमडले की काय होतं, हे वर उल्लेख केलेल्या नाशिककरांनी अनेकदा अनुभवलं असेल. विशिष्ट वेळची कसारा-सीएसएमटी लोकल पकडायची असेल, तर त्याला जोडणारी कसारा एसटी वेळेत गाठल्याशिवाय गत्यंतर नाही. एसटी हुकली, तर पुढचं सगळंच नियोजन कोलमडतं. किंबहुना पुढच्या कोणत्याही कामांच्या वेळा गाठणं मग कठीण होऊन बसतं. तिसऱ्या लाटेबाबत आता जे भाकीत संसर्ग अभ्यासक आणि शास्त्रज्ञ वर्तवत आहेत, त्यास रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय अन्य कोणताही ठोस पर्याय नाही. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत किती लोकसंख्येचे दुसरे डोस पूर्ण होतात, यावर आगामी लाटेचे परिणाम किती व कसे होतील, हे स्पष्ट होणार आहे.


लसीकरणाच्या बाबतीत केंद्र सरकारचं नेमकं कसारा एसटीसारखं झालंय. घाईघाईत १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरणाची घोषणा झाली. केंद्रापाठोपाठ राज्यानेही त्यावर पाऊल ठेवलं. पण, ही घोषणा करताना आपली पहिली एसटी हुकली, याची कल्पना दोन्ही सरकारांना आली नाही. लसीकरण अत्यंत उशिरा आणि मंदगतीने सुरू झालंय. लसीकरण हा विषय केंद्राने संपूर्णपणे आपल्याच अखत्यारित ठेवला. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. ४५ ते ६० हा वयोगटच नव्हे, तर अजूनही कोट्यवधी ज्येष्ठ नागरिक लशीपासून वंचित आहेत. लाखो फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा पहिला डोस मिळायचा आहे. ४५ ते ६० वयोगटातील ज्यांचे पहिले डोस झालेले आहेत, त्यांचे दुसरे डोस अजून व्हायचे आहेत. दुसरीकडे लसीकरणाबाबत मुस्लिम समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या कार्यरत नाही. हा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळला जाणं गरजेचं आहे. सध्या अत्यंत तोकड्या संख्येने लशी उपलब्ध होतात. त्यासाठी पुरेशा रेफ्रिजरेशनची व्यवस्था आपल्याकडे नाही. अनेक ठिकाणी रेफ्रिजरेशनचे संकेत पाळले जात नाहीत, हे विदारक वास्तव आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत केंद्र सरकारची पहिली एसटी, तर कधीच हुकलीय. त्यामुळे पुढचं वेळेचं सगळंच वेळापत्रक कोलमडलय. लशींचा पुरवठा अजूनही पुरेशा प्रमाणात होऊ शकलेला नाही. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाही अनेक केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध होत नाही. आधी असलेलं दोन डोसमधील अंतर ८५ दिवस करण्यात आलं. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर सध्या कमी गर्दी दिसत असली तरी, ही गर्दी पुढे एकदम वाढणार आहे. एसटी हुकलेले प्रवासी अचानक मोठ्या संख्येने कसारा स्थानकात दाखल झाल्यावर जशी झुंबड उडून लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते, तशी स्थिती इथंही ओढावण्याची शक्यता आहे.


आता लसीकरण मोहीम सक्षमपणे राबवायची झाल्यास परदेशांतील सर्व लशींना सरसकट परवानगी द्यायला हवी. खासगी रुग्णालयांची मदत या मोहिमेसाठी पूर्ण क्षमतेने घ्यायला हवी. अठरा वर्षांवरील सर्वांना तातडीने लसीकरण सुरू करायला हवे. ज्या-ज्या देशांमधून लशी विकत घेता येतील, त्या घ्यायला हव्यात. जे लशीसाठी पैसे देऊ शकतात, त्यांना फुकट लस देण्याची अजिबात गरज नाही. वेळेत आणि पुरेशा प्रमाणात लशींचा साठा निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे केंद्र सरकारने तातडीने करायला हवेत. त्यासाठी आपल्या राज्यासह अन्य राज्यांनी केंद्राकडे तगादा लावावा. कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या माणसापर्यंत लस कशी पोचेल, यासाठी नियोजन करायला हवं. आशासोविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस यांची लसीकरणासाठी मदत होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागांतील शाळांमध्ये झालेलं रुबेला लसीकरण याच टीमने यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. रेफ्रिजरेशनची कडेकोड व्यवस्था ही सगळ्यात आवश्यक बाब आहे. खासकरून परदेशी लशींसाठी उणे ७०-८० अंश तापमानाची व्यवस्था उभारणं हे मोठं आव्हान आहे. पहिली एसटी जरी हुकली तरी, अन्य वाहनाने कसारा गाठून सीएसएमटीची इच्छित लोकल गाठण्यासाठी काही प्रयत्न होतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Constituency Lok Sabha Election Result: विशाल पाटलांचा लिफाफा दिल्लीत पोहचला, कदमांनी केला संजयकाकांचा करेक्ट कार्यक्रम?

Stock Market Crash: 'या' 4 कारणांमुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला शेअर बाजार; कोरोना काळातील आठवणीला उजाळा

India Lok Sabha Election Results Live : महाराष्ट्र, यूपी-बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; राममंदिर फॅक्टर फसला?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : नंदुरबारमधून काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी, तर सांगलीतून अपक्ष विशाल पाटील विजयी, पियूष गोयलांचा देखील मोठा विजय

South Central Mumbai Lok Sabha Result : शेवाळेंची हॅट्रिक हुकणार? अनिल देसाईंना मिळाली महत्वाची आघाडी!

SCROLL FOR NEXT