kolhapur Temperature peaks in Death Valley California USA
kolhapur Temperature peaks in Death Valley California USA 
Blog | ब्लॉग

अबब... 'हे' ठिकाण आहे पृथ्वीवरील सर्वात उष्ण 

संजय उपाध्ये

जगभर कोवीड-19 व्हायरसचा कहर सुरु असतानाच तिकडे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील डेथ व्हॅलीत तापमानाने उच्चांक गाठत तब्बल 54.4 डिग्री सेल्सियस इतकी नोंद केली. त्यामुळे डेथ व्हॅली याची पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण अशी नोंद झाली आहे. 

 कॅलिफोर्नियात सध्या उष्ण वारे वाहात आहेत. डेथ व्हॅली म्हणजे कॅलिफोर्नियातील छोटे वाळवंटच आहे. निर्जन, रखरखीत असा हा प्रांत आहे. तेथे तापमान नेहमी जास्त असते. या जास्त तापमानामुळे तेथे प्राणी, पक्षी, वनस्पती तग धरु शकत नाहीत. त्यावरुनच त्याला "डेथ व्हॅली' असे नाव पडले. पण रविवारी तापमानाने सर्व उच्चांक मोडीत काढत डेथ व्हॅलीने 54.4 डिग्री सेल्सियसची (129.9 फॅरेनाईट) नोंद केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही नोंद घेतली आहे. त्यात अचूकता आहे. यापूर्वी 1913 ला याच डेथ व्हॅलीने तब्बल 56.6 अंशाची नोंद दाखविली होती. मात्र या नोंदीबद्दल शास्त्रज्ञांत मतभिन्नता होती. पण रविवारी सायंकाळी 3 वाजून 41 मिनिटानी हे सर्वोच्च तापमाना नोंदविले गेले. डेथ व्हॅलीतील फर्नेस क्रीक येथे असलेल्या युनायटेड स्टेटस नॅशनल वेदर सर्वीस या स्वयंचलित प्रयोगशाळेने या तापमानाची नोंद घेतली आणि डेथ व्हॅलीने पृथ्वीतलावरील सर्वात उष्ण जागा असा मान पटकाविला. रविवारबरोबरच सोमवारी आणि मंगळवारीही तितक्‍याच तापमानाची नोंद झाली. 

दहा जुलै 1913 या दिवशीही याच डेथ व्हॅलीमध्ये 56.6 डिग्री सेल्सियसची नोंद झाली होती. पण त्यावेळी आताच्यासारखे अत्याधुनिक तापमान मोजणी यंत्रणा नव्हती, त्यामुळे या नोंदीबद्दल तसेच त्याच्या अचुकतेबद्दल शास्त्रज्ञांत अनेक वर्षापर्यंत वाद होता. जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) 1913 च्या नोंदी ग्राह्य मानल्या होत्या. त्याचवेळी 1922 ला लिबियात नोंदविलेल्या 58 डिग्री सेल्सियसला मान्यता दिली नाही. तापमानाबद्दल आणखी एक जुनी नोंद ट्युनिशिया देशात 1931 ला झाली होती. पण त्यालाही डब्ल्यूएमओने आक्षेप घेतला. 

डेथ व्हॅलीतील 1913 च्या 56.6 डिग्री सेल्सियस नोंदीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करताना "अचूक तापमानाची नोंद करता येणे शक्‍य नसल्याचे' संस्थेने म्हटले आहे. पण संस्था आणि शास्त्रज्ञ, तज्ज्ञांनी 30 जून 2013 ला डेथ व्हॅली येथे नोंदविलेल्या गेलेल्या 54 डिग्री सेल्सियसला मान्यता दिली. तसेच 2016 ला कुवेतमध्ये आणि 2017 मध्ये पाकिस्तान नोंदविलेल्या सर्वोच्च तापमानही ग्राह्य धरले. तसेच या नोंदी पृथ्वीवरील सर्वोच्च तापमान असलेले ठिकाण अशा नोंदविल्या गेल्या. पण रविवारी (ता. 16) नोंदविल्या गेलेल्या तापमानाला तंत्रज्ञानानुसार नोंदविलेल्या गेलेली अचूक तापमान नोंद, असेही संस्थेने म्हटले आहे. 

डेथ व्हॅलीतील या भयानक तापमानामुळे हवेतील आर्द्रता केवळ 7 टक्‍क्‍यावर आली. डेथ व्हॅली ही कॅलिफोर्निया राज्याच्या अतिशय सीमेवर असून नेवाडाचा वाळवंट जवळच आहे. आणि नेवाडा म्हणजे अमेरिकेतील सर्वात शुष्क तसेच उष्ण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांसाठी धोक्‍याचा इशारा देताना नेवाडा राज्याच्या सीमेवर आगीच्या घटना घडण्याच्या शक्‍यता असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सावधानता बाळगावी असेही म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूल तापमानातील मोठे बदल हे हवामानातील बदलामुळे होत असल्याचा इशाराही तज्ज्ञानी दिला आहे. 107 वर्षानंतर मोजल्या गेलेल्या या तापमानाने मात्र मानवाच्या इतिहासात एका वेगळी नोंद झाली. 

उष्णतेचा परिणाम 
कोणत्याही मानव अथवा प्राण्यावरही 54.4 डिग्री सेल्सियसचा मोठा परिणाम होऊ शकतो. उष्णतेमुळे त्वचा खराब होऊ शकते. हृदयावर परिणाम तसेच किडनीच्या कामावरही मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे डेथ व्हॅलीकडे जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही जागतिक हवामान संस्थेने म्हटले आहे. 
  
""डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये गेल्या पाच वर्षापासून काम करते. ऑगस्ट महिन्यात उष्णतेची मोठी लाट आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील बहुतांश काम घरात, प्रयोगशाळेत गेला आहे.'' 
ब्रॅंडी स्टुअर्ट, डेथ व्हॅली 


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT