High tempreture
High tempreture Sakal
Blog | ब्लॉग

माथ्यावरी तळपे ऊन... शहरवासीयांनी किमान एवढे तरी करावे!

सकाळ वृत्तसेवा

पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, पुणे

वेळ झाली भरमध्यान्ही

माथ्यावरी तळपे ऊन...

नको जाऊ कोमेजून

माझ्या प्रीतीच्या फुला.....

आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांनी ४० वर्षापूर्वी केलेले हे काव्य... डांबरी रस्त्यावर काम करणाऱ्या एका महिलेची तापलेल्या उन्हात, आपल्या तान्ह्याप्रती व्यक्त झालेली असहाय्य वेदना या गीतातून आळविलेली आहे. पुढे कवी म्हणतो.

तप्त दिशा झाल्या चारी

भाजतसे पृथ्वी सारी...

आज बहुसंख्य मानवजातीला जीवघेण्या ठरत असणाऱ्या तापमानवाढीच्या वस्तूस्थितीचे वर्णन याहून वेगळे असावे असे वाटत नाही.

देशभरातून तापमानवाढीच्या भयावह बातम्या येत आहेत. तापमानवाढीची पराकोटीची अवस्था कशामुळे झाली याचे आत्मचिंतन केले तर हे सुस्पष्टपणे समजून येते की अनेक वर्षे आपण वृक्ष लागवडीचे नि सुधारणांच्या नावाने विकासाचे जे सूत्र जोपासले ते कुठेतरी निश्चितपणे चुकलेले आहे आणि हे मान्य करावेच लागेल. शासनाचे पर्यावरण विषयक धोरण हे चुकीचे ठरले हे मान्य करत असतानाच दोषारोप करत राहिलो तर यापुढे कवी अनिल यांच्या कवितेत नमुद केलेल्या वेदनेपेक्षा भीषण अवस्था होणार आहे.

यासाठी प्रत्येकाने आपल्या सभोवती हिरवळ कशी राहील आणि पाण्याचा वापर करताना प्रदूषण होणार नाही व पाण्याचा वापर जास्तीत जास्त हरीत निसर्ग निर्मितीसाठी कसा होईल याचा हे लक्षात घेऊन पावलोपावली जमेल त्या मार्गाने देशी झाडे लावणे गरजेचे आहे. भूमीचे आच्छादन हिरवेगार होणे गरजेचे आहे.

आज उंच इमारतीमधील रहाणीमान केवळ वातानूकुलीत यंत्रणेच्या भरवशावर आहे. तेव्हा अशा ठिकाणी राहणाऱ्यांनी आपल्या घराच्या खिडक्या नि बाल्कनीत सदाहरित देशी वनस्पती कुंड्यांमधून वाढवल्या तर भविष्यात आपल्या घरापूरते तरी काहीसे तापमान नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. शहरवासीयांनी किमान एवढे तरी करावे नि सार्वत्रिक तापमान वाढ रोखण्याकामी हातभार लावावा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण व आरोग्य साक्षरता अभियानांतर्गत प्रकाशित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT