Spring - Astronomical New Year
Spring - Astronomical New Year 
Blog | ब्लॉग

वसंतारंभ - खगोलीय नववर्ष 

शंकर शेलार, खगोल अभ्यासक

आज शनिवार (20 मार्च). हा दिवस वर्षातील पहिला "विषुवदिन' आहे. या दिवशी सूर्य आकाशात बरोबर विषुववृत्तावर उभा असतो. या दिवसापासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतूस प्रारंभ होतो. म्हणून या बिंदूस "वसंत संपात' म्हणतात. तो दिवस व रात्र समान कालावधीचे (12-12 तासांचे) असतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि बरोबर पश्‍चिमेला मावळतो. सुमारे 1 हजार 700 वर्षांपूर्वी वसंत संपात बिंदू हा राशीचक्राच्या प्रारंभीच (मेष राशीत) होता. भारतीय नववर्षाच्या सुरुवातीचा गुढीपाडवा हा सण तेव्हाच येत असल्याने या दिवसाला नववर्षाचा मान होता. पृथ्वीच्या परांचनामुळे (precession) हे संपात बिंदू 72 वर्षात एक अंशाने मागे सरकत आहेत. परिणामी सध्या गुढीपाडवा 23 दिवस उशीर येत आहे. 

पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते. तिचा अक्ष भ्रमण प्रतलाशी काटकोनात नसून तो 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या विषुव वृत्ताने आकाशात तयार होणारे काल्पनीक "वैषुवीक' वृत्त आणि सूर्याचा आकाशातील भासमान भ्रमण मार्ग (आयनिक वृत्त) यांच्यामध्ये 23.5 अंशाचा कोन तयार होऊन ती एकमेकांस दोन बिंदूत छेदतात. या बिंदूना संपात बिंदू म्हणतात. वसंत संपात (Vernal equinox) व शरद संपात (Autumnal equinox). 

पृथ्वीचा अक्ष कललेला असल्याने सहा महिने तिचा उत्तर ध्रुव तर सहा महिने दक्षिण ध्रुव सूर्यासमोर येत असतो. त्यामुळे सहा महिने सूर्य उत्तर गोलार्धात तर सहा महिने दक्षिण गोलार्धात प्रवास करताना दिसतो. यालाच सूर्याचे उत्तरायण -दक्षिणायण असे म्हणतो. दक्षिण गोलार्धात (23.5 अंश) मकरवृत्तावर पोहोचल्यावर सूर्य पुन्हा उत्तरेकडे वळतो, या बिंदूस विष्टंभ (winter solstice) म्हणतात. येथे सूर्य 21 डिसेंबरला असतो. हा दिवस वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. तसेच उत्तर गोलार्धात (23.5 अंश) कर्कवृत्तावर पोहोचल्यावर सूर्य पुन्हा दक्षिणेकडे वळतो, या बिंदूस विष्टंभ (summer solstice ) म्हणतात. येथे सूर्य 21 जूनला असतो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. 

दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जाताना सूर्य वैषुविक वृत्तावर असतो. त्या दिवसाला "विषुवदिन' म्हणतात. राशीचक्रावरील या बिंदुला "वसंत संपात' म्हणतात. येथे सूर्य 19, 20 किंवा 21 मार्च रोजी असतो. त्यादिवशी उत्तर गोलार्धात वसंत ऋतूस प्रारंभ होऊन दिनमान वाढू लागते. दक्षिण गोलार्धात मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तिकडे हिवाळा सुरू होऊन दिनमान घटू लागते. राशीचक्रावर "वसंत संपात' बिंदू समोरील 180 अंशावरील बिंदूस "शरद संपात' बिंदू म्हणतात. येथे सूर्य 22 किंवा 23 सप्टेंबरला असतो. हा दिवस वर्षातील दुसरा विषुवदिन असतो. 

खगोल प्रेमींसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. सूर्याच्या उदय- अस्ताच्या वेळांची नोंद घेऊन, काही वस्तूंच्या सावल्यांच्या साहाय्याने प्रयोग करून काही निष्कर्ष काढता येतात. जिज्ञासूंनी या दिनाचे खगोलीय महत्व लक्षात घ्यावे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT