world yoga day history in india 
Blog | ब्लॉग

जागतिक योगा दिन ; काय आहे योगाचा इतिहास जाणून घ्या...

सकाऴ वृत्तसेवा

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून ओळखला जातो. योगा हा योगायोग या शब्दातील शब्द नव्हे, तर त्याचा अर्थ आहे, आत्मा परमात्म्यात विलीन होणे. योगास पाच हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे, की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे. ज्यात शरीर ताणले, वाकविले, पिळले जाते आणि अवघड श्वयसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो; पण ही एवढीच मर्यादित क्रिया नसून योगाभ्यासात माणसाच्या जीवनशैलीची परिपूर्ण ओळख करून घेता येते. योगाबद्दल श्री. श्री. रविशंकर यांनी असे म्हटले आहे की,  योग म्हणजे निव्वळ व्यायाम, आसन आणि श्वनसन अभ्यास नव्हे, तर हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत आध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्‍यतांची ओळख करून देणारे शास्त्र होय.’’ अशा या सर्व मनुष्य प्राण्यास सदैव ताजेतवाने ठेवणाऱ्या व सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या योगशास्त्राचा उल्लेख भगवद्‌गीतेसह महाभारतातही आढळतो. 


देशाचा इतिहास पाहता वेद उपनिषदांच्या काळापासून भारतवर्षास ऋषीमुनींची परंपरा लाभली आहे. त्या काळात अनेक ऋषीमुनींनी योग साधनेद्वारे तपश्‍चर्या करून बौध्दिक व आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती केली आहे. योग साधनेद्वारे मनुष्याच्या जीवनात आमुलाग्र बदल होऊ शकतो, तसेच योगसाधनेच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व आत्मविश्वाकस प्राप्त करता येतो. योगाभ्यास करण्यासाठी सकाळ किंवा सायंकाळ यापैकी कोणत्याही वेळी योगसाधना करता येते. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकजणांना व्यवसाय, नोकरी, दैनंदिन व्यवहार यांपासून अलिप्त राहून घरी थांबावे लागले आहे. अशावेळी योगसाधना करण्याची अमूल्य संधी प्राप्त झाली आहे, असे समजून योगसाधनेसाठी थोडा वेळ खर्च केला तर निश्‍चितच आपले आरोग्य सुधारण्यासाठी व शरीर निरोगी ठेवण्यासाठी फार मोठी मदत होईल, अशी खात्री आहे. 


२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून संपूर्ण जगभर उत्साहाने साजरा केला जातो. सदर दिनाचे महत्त्व योग साधना करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सर्वांनी जाणून घेतल्याने वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. यामध्ये योग शििबरे, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके अशा वेगवेगळ्या स्वरूपात या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. सध्या खास करून तरुण वर्गाने या योगसाधनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मानवाच्या आयुष्यात अनेक आजार, व्याधी, रोग यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढत जाणारे हवा, पाणी प्रदूषण, शेतीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर यामुळे मानवाच्या जीवनात अनेक विषारी व घातक पदार्थांचा समावेश अन्नपाण्याद्वारे होऊ लागला आहे. त्यामुळे मानवाची जीवनशैलीच बिघडत चालली आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे औषधांपेक्षाही शारीरिक समतोल चांगला ठेवण्याची कला म्हणजे योग अभ्यास व आचरण होय.


योग साधनेचे महत्त्व सांगण्याचा फार मोठा प्रयत्न योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. त्यांनी लोकांना योगाची ओढ लागण्यासाठी केलेला प्रयत्न निश्‍चितच गौरवास्पद आहे. आपणांस शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्हायचे असेल तर व आपली सकारात्मक ऊर्जा नेहमीच वाढती ठेवायची असेल तर योग साधनेस प्राधान्य देणे आवश्‍य क व महत्त्वाचे आहे. योग साधना ही एक अशी कला आहे की ज्यामुळे आपले मन व शरीर या दोहोंवर नियंत्रण ठेवता येते. तसेच मानसिक संतुलन उत्तम ठेवणे शक्‍यह होते. रोजच्या तणावाच्या वातावरणामध्ये शरीर तंदुरुस्त आणि मन उत्साही, आनंददायी व नेहमी सकारात्मक ऊर्जायुक्त ठेवायचे असेल तर प्रत्येकाने रोज योगासने करावीत. त्यामुळे शरीर लवचिकही होते व स्नायूही बळकट होण्यास मदत होते. योग साधनेतील प्राणायाम केल्याने श्वसनाचे विकार होण्यापासून निश्‍चितच दूर राहाता येते. मनुष्यास मन:शांती व शरीर सुदृढता लाभली तर सुखाची परिणती अनुभवता येते. आजच्या धावपळीच्या युगात माणसास स्वास्थ्य व सुख लाभावे यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती गरज केवळ या योग साधना व प्राणायाम याद्वारे साध्य करता येईल.


योग साधना करण्यासाठी एखाद्या योग तज्ज्ञाकडून आवश्‍यसक तेवढे मार्गदर्शन घेतले तरी पुष्कळ होते. एकदा का आपणांस त्यातील प्राथमिक ज्ञान मिळाले की आपण स्वत: घरी योग साधना व प्राणायाम करू शकतो, मात्र त्यात सातत्य ठेवणे विसरून चालणार नाही. माझ्या अनुभवानुसार योग साधनेसाठी सकाळी सूर्योदयापूर्वीची वेळ चांगली आहे. सकाळी योग साधना केली तर आपला संपूर्ण दिवस आनंदात, उत्साहात जातो. सुरवातीस योगासने करताना आपल्या शरीरास अतिताण न देता आपल्या सहनशीलतेनुसार योगासने करा. पुढे पुढे सवयीनुसार योगाची तीव्रता वाढत जाऊन त्याचा लाभ मिळण्यास सुरवात होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Railway: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! उरळीवरून जाणार पुणे-नाशिक लोहमार्ग; ताशी १६० किलोमीटर वेग, नेमका कसा असेल मार्ग..

Goras Bhandar FDA Action : वर्धेतील 'गोरस भंडार'वर कारवाई का केली? उच्च न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

SCROLL FOR NEXT