thief_
thief_ 
Citizen Journalism

घोडबंदर रोडवरुन प्रवास करताना काळजी घ्या

रुपेश म्हशेळकर

१६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास मी घोडबंदर मार्गे विरारला जात असताना माझी गाडी कासारवडवली नाक्याजवळ मेन रोड सिग्नलला वडवली बस स्टॉप जवळ स्लो झाली असताना, अचानक डाव्या बाजुने एका व्यक्ती काचेवर जोरजोरात हात मारु लगला, माझा समज झाला की चाक बहुदा पायवरुन गेले असावे म्हणुन मी काच खाली केली आणि त्या माणसाने डोकं खिडकीतुन आत टाकत भांडु लागला. त्याच्याशी बोलत असताना दुसऱ्या बाजुने त्याच्या सोबतचा दुसरा माणुस माझ्या ड्रायव्हींग सिटच्या बाजुचा दरवाजा जोरात ठोकुन ओरडु लागला. या दोघांना मी 'बाजुला या, बात करते हे 'असं बोललो आणि गाडी साईडला घेइ पर्यंत हे मागुनच जाऊ लागले. आरश्यात त्यांना जाताना बघुन मला संशय आला आणि मी माझा मोबाईल आणि पाकीट तपासु लागलो. पण पाकीट चोरीला गेले होते. डाव्या आणि उजव्या बाजुला दोन चोरानी मला भांडणात गुंतवुन चोरी केली होती.

चोरी झाली हे मला १०-१५ सेकंदात माहीत पडले. त्यांच्या दिशेने धावत गेलो पण सापडले नाहीत. आजुबाजूला सीसीटिव्ही कॅमेरे सुधा आहेत का बघीतले पण निराशा हाती आली आणि माझे पाकीटातील रोख १२००० रुपये, ड्रायव्हींग लायसंस, पॅनकार्ड , एटीम कार्ड सगळंच चोरीला गेलं.

वडवली पोलीस स्टेशनला तक्रार करत असताना अजुन ३-४ केसेस आल्या. पिशव्या आणि पर्सला ब्लेड मारुन चोरी केल्याच्या घटना होत्या. पण पोलीस तक्रार घेताना चोरीची न घेता वस्तु गहाळ झाल्याची घेत होते जे अगदी चुकीचे आहे. मी माझी तक्रार चोरी म्हणुन घ्या बोल्यावर सुद्धा पोलीस लिपीक घेण्यास तयार नव्हते. एक पाटील कॉंस्टेबल यांनी घटनास्थळी जाउन चौकशी केली तोच काय तो आधार(आपण अशी घटना झाल्यावर पोलीस तक्रार नोंदवताना नेमके काय लिहीताहेत ते कृपया बघत जा). 

आणखी चौकशी केली असता कळालं की हे चोरीचे प्रकार दर गुरुवारी भरणाऱ्या वडवलीच्या मार्केट आणि त्या परीसरात होतात. 

सुचना :
१) गाडी थांबली अथवा चालु असताना, दुसऱ्या कुठल्याही व्यक्ती बरोबर वाद आणि भांडणे टाळा 

२)वाद झालाच तर काच थोडीच पण आवाज येइल इतकीच खाली करा बाहेर पडणं टाळा .

३)वाद भांडण झालेच आणि खाली उतरायची गरज वाटलीच तर गाडीच्या काचा बंद करुन गाडी लॉक करुन उतरत जा 

४) पेट्रोल सीएनजी भरताना जरी खाली उतरलात तरी दरवाजा लॉक करत जा 

५) पाकीट, मोबाईल, लॅपटॉप हे सर्व गाडीत सीट वर ठेवणे टाळा 

६) गाडीत कीमती वस्तु ठेउन कुठेही जाउ नका, स्वत:बरोबर नेल्यास उत्त्म .

कृपया घोडबंदर रोड वरुन प्रवास करताना, प्रामुख्याने गुरुवारी काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT