Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Latest News: देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

काँग्रेसने ओडिशातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 2 आणि ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. नागेंद्र प्रधान आणि सुरेश महापात्रा हे अनुक्रमे संबलपूर आणि कटक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

महिला असूनही ममता बॅनर्जी यांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे.

हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसने राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं. हा प्रभू श्रीरामांचा आणि पाचशे वर्षे तपश्चर्येचा अवमान आहे. भगवान हनुमानाची ही भूमी काँग्रेसला माफ करणार नाही, असं मोदी म्हणाले.

आप उमेदवाराच्या प्रचारार्थ दिल्लीमध्ये सुनीता केजरीवाल यांचा रोड शो

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पश्चिम दिल्लीत लोकसभा उमेदवार महाबल मिश्रा यांच्या समर्थनार्थ रोड शो केला.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सुनीता केजरीवालांचा दिल्लीत रोड शो

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पश्चिम दिल्लीत AAP पश्चिम दिल्ली लोकसभा उमेदवार महाबल मिश्रा यांच्या समर्थनार्थ रोड शो केला.

उत्तर प्रदेशात ट्रक अन् बस यांच्यात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

 भाजपकडून आरक्षण अन् संविधानावर हल्ला - राहुल गांधी

दमण : "भाजपचे लोक आरक्षण आणि संविधानावर हल्ला करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही..." असे मत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मालदा उत्तर येथे जाहीर सभेत कलाकारांसोबत नृत्य केलं. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

आंध्र प्रदेश: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गा स्टॅलिन यांनी तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली.

माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पुतण्याला आपल्याकडे खेचलं असून यादरम्यान धवलसिंह मोहिते पाटील यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली. धैर्यशील मोहिते पाटील यांची दहशत संपवण्यासाठी भाजपाला पाठींबा दिल्याचं धवलसिंह मोहिते यांनी सांगितलं. दरम्यान हा महाविकास आघाडी आणि मोहिते पाटील यांना फडणविस यांचा धक्का मानला जात आहे.

Narendra Modi: कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

Narendra Modi: 10 मे रोजी कल्याण पश्चिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून मोदी हे महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील व कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.

Sahil Khan : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी आज सकाळी अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांना 2,000 सिम कार्ड आणि 1,700 बँक अकाउंट्स मिळाले होते. मात्र यातील एकही गोष्ट साहिलच्या नावे नाही. त्याला या प्रकरणात अडकवण्यात येतंय. आम्ही पोलीस आणि न्यायालयाला पूर्णपणे सहाय्य करत आहोत अशी माहिती साहिलच्या वकिलांनी दिली.

PM Modi : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात आहेत. याठिकाणी बोलताना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडलं. "एकीकडे ते लोक आहेत, ज्यांनी व्होट बँकेसाठी राम मंदिराचा अपमान केला; आणि दुसरीकडे अन्सारी कुटुंबीय आहेत, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करत राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली" असं पंतप्रधान म्हणाले.

Amit Shah : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

उत्तर प्रदेश : कासगंज येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "राहुल बाबा मागासवर्गीयांच्या नावाने खोटे बोलत आहेत. ते म्हणतात की, भाजपने 400 जागा जिंकल्या तर भाजप देशातील आरक्षण हटवेल. ते काही होणार नाही. आरक्षण हटवण्यासाठी आमच्याकडे पूर्ण बहुमताने दोन टर्म होते, पण नरेंद्र मोदी आरक्षणाचे समर्थक आहेत. आज मी तुम्हाला मोदी हमी देतो की एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही. किंवा आम्ही इतर कोणालाही ते करू देणार नाही."

BJP leader Shaina NC : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत

खासदार संजय राऊत यांच्या विधानावर भाजप नेत्या शायना यांनी हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, तुमच्याकडे महाविनाश आघाडी आहे आणि आमच्याकडे महायुती आहे, जी फक्त 'विकासा'साठी काम करते. महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत, असं त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर झालेला हल्ला अयोग्य - छगन भुजबळ

प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, PM मोदींचा घणाघात

बेळगाव, कर्नाटक : "काँग्रेसचे राजपुत्र म्हणतात की, भारतातील राजे-महाराजे अत्याचारी होते, त्यांनी गरिबांची जमीन हिसकावून घेतली. काँग्रेसच्या राजपुत्राने छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा यांचा अपमान केला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावमधील सभेत केला.

Dhule Lok Sabha : डॉ. सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी उपमख्यमंत्री यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे, जयकुमार रावल, गिरीश महाजन, विजय चौधरी हे उपस्थितीत राहणार आहेत.

Bhiwandi Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 मे रोजी भिवंडीत सभा

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांकरिता येत्या १० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींचा झंझावात प्रचार सुरु आहे.

Goa Alcohol : शिरवडेच्या हद्दीत गोवा बनावटीची १७ लाखांची दारू जप्त; एकाला अटक

कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावरून शिरवडेकडे निघालेल्या सहाचाकी ट्रक अडवून उत्पादन शुल्कने केलेल्या कारवाईत सुमारे १७ लाखांची गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक जप्त केली. काल रात्री अकराच्या सुमारास कारवाई झाली. त्यात तब्बल १७ लाखांची दारू व सहाचाकी ट्रकसह उत्पादन शुल्कने ३२ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. किरण कृष्णा नाईक (वय 22 वर्षे रा. बांधा ता. सावंतवाडी) यास अटक आहे.

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते आहेत, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. ते माध्यमांशी संवाद साधत होते. नाशिकचा उमेदवार लवकर जाहीर व्हावा, असंही ते म्हणाले.

पोलादपूर येथील तिहेरी अपघातात दुचाकीस्‍वार ठार

Poladpur News: मुंबई- गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाच्या जवळ तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्‍यू झाला असून सहप्रवासी जबर जखमी झाला आहे. 

अखेर कारडाप्रकरणी 19 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर उपनगर पोलिसांत १९ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मृत कारडा यांच्या पत्नी भारती कारडा यांनी यासंदर्भात उपनगर पोलिसांत २१ एप्रिलला फिर्याद दिली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजता वानवडीतील रेसकोर्सच्या मैदानावर ‘महाविजय संकल्प सभा’ होणार आहे. यासाठी चारही मतदारसंघांतून सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहतील, त्या अनुषंगाने महायुतीतील सर्व घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

Railway News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एलटीटी-गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्यांच्या ३० अतिरिक्त फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते गोरखपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Sanjay Raut: काही ठिकाणी महायुतीनं औपचारिकता म्हणून उमेदवार दिलाय- संजय राऊत

मविआ राज्यात ३० ते ३५ जागा जिंकेल. काही ठिकाणी महायुतीनं औपचारिकता म्हणून उमेदवार दिला आहे. अजित पवार व्यापाऱ्यांना धमकी देत आहेत. निकम उमेदवार असले तरी महाआघाडीच जिंकणार, असं संजय राऊत पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Prakash Shendge: प्रकाश शेंडगेंच्या गाडीला अज्ञातांकडून चपलाचा हार, शाई फेकली

प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलाचा हार घालण्यात आला आहे. तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली आहे.

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम मुंबादेवीच्या दर्शनाला

भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी आज मुंबादेवीचे दर्शन घेतले. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ताकद दे असं साकडं देवीकडे घातलं असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Nilesh Lanke: निलेश लंकेंसाठी शरद पवारांची आज नगरमध्ये सभा

निलेश लंकेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आज अहमदनगरमध्ये सभा घेणार आहेत. त्यांच्या आज एकूण तीन सभा आहेत.

Bhandup: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाने मोठा कारवाई केली आहे. पैशांनी भरलेली एक व्हॅन पथकाकडून जप्त करण्यात आली आहे

किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वधारले आहे. त्यामुळे गृहणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असले तरी तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील झडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com