Chaitra Navratri
Chaitra Navratri esakal
संस्कृती

Chaitra Navratri : नवरात्रीत हे महाउपाय केल्यास व्हाल मालामाल, ही वस्तू दान करा अन् बघा चमत्कार

सकाळ ऑनलाईन टीम

Chaitra Navratri 2023 : माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात. या दिवसात माता अंबेच्या 9 रूपांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात पूजा-अर्चनेसोबतच दानधर्माचेही महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या 9 दिवसात काही खास गोष्टींचे दान केल्यास व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. जाणून घ्या या महिन्यात कोणत्या गोष्टींचे दान करणे फायदेशीर आहे.

नवरात्रीत या वस्तूंचे दान करा

पुस्तके दान करा

ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तू दान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व असते. असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही.

केळी दान

याशिवाय केळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुखसमृद्धी वाढते असे म्हणतात. धनवृद्धी होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभ फळ मिळते.

ही गोष्ट हिरव्या कपड्यात गुंडाळा

ज्योतिष शास्त्रानुसार माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो. अनेक वेळा नियमानुसार विधीवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळतो. नवरात्रीच्या विशेष दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या दु:खापासून मुक्ती मिळवायची असेल, तर नवरात्रीच्या 9 दिवसात माता जगत जननीला हिरव्या कपड्यात छोटी वेलची दान करा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारी सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. (Navratri)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT