Dev Diwali 2023
Dev Diwali 2023  esakal
संस्कृती

Dev Diwali 2023 : देव दिवाळीला दीपदान कसे करावे? जाणून घ्या दीपदानाचे महत्व

Monika Lonkar –Kumbhar

Dev Diwali 2023 : यंदा देव दिवाळी ही २७ नोव्हेंबरला अर्थात उद्या (सोमवारी) साजरी केली जाणार आहे. देव दिवाळीला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते. या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता.

भगवान शंकरांचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्व देव-देवता गंगेच्या किनारी आले होते आणि त्यांनी असंख्य दिवे प्रज्वलित करून हा विजयोत्सव साजरा केला होता, अशी धार्मिक मान्यता आहे.

त्यामुळे, देव दिवाळीच्या दिवशी दीपदान करणे हे शुभ मानले जाते. आज आपण देव दिवाळीच्या दिवशी दीपदान कसे करावे? आणि या दीपदानाचे महत्व काय? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

देव दिवाळीला असे करा दीपदान

  • कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच देव दिवाळीच्या दिवशी पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर स्नान करावे. त्यानंतर, उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर, तुळशीला पाणा घालावे.

  • तुळशीला पाणी घातल्यानंतर भगवान महादेव आणि भगवान विष्णू यांची विधीवत पूजा करावी.

  • देव दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात पिठाचे ११, २१, ५१ आणि १०८ दिवे प्रज्वलित करावेत.

  • यानंतर, सर्व देवी-देवतांचे स्मरण करून प्रज्वलित केलेल्या दिव्यावर कुंकू, हळद, अक्षदा आणि फुले अर्पण करा. त्यानंतर, नदीत दिव्याचे विसर्जन करावे.

  • तुमच्या घराच्या अंगणात, तुळशीला आणि देवघराजवळ ही दिवे प्रज्वलित करा.

दीपदानाचे महत्व काय?

धार्मिक मान्यतेनुसार, देव दिवाळी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता. भगवान शंकारचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्व देव-देवता गंगेच्या तीरावर काशीमध्ये आले होते, आणि त्यांनी असंख्य दिवे प्रज्वलित केले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे, या उत्सवाला प्रकाशाचा उत्सव असे ही म्हटले जाते.

या दिवशी प्रदोष काळात दीपदान केल्यास जीवनात सूख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते, असे म्हटले जाते. देव दिवाळीच्या दिवशी भगवान शंकराला दिवा लावल्याने जीवनात आनंद मिळतो आणि यासोबतच त्यांचा आशीर्वाद ही मिळतो अशी देखील मान्यता आहे. देव दिवाळीला दीपदान केल्याने यम, शनी, राहू-केतू यांचा ही प्रभाव कमी होतो असे मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT