संस्कृती

Dream Astrology : स्वप्नांना हलक्यात घेऊ नका; 'या' गोष्टी दिसल्या तर धनलाभाची शक्यता

जर एखादं स्वप्न तुम्हाला पुन्हा पुन्हा पडत असेल, तर याचा अर्थ त्यातून तुम्हाला काहीतरी सांगायचं किंवा सुचवायचं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dreams Meaning : प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो. जर एखादं स्वप्न तुम्हाला पुन्हा पुन्हा पडत असेल, तर याचा अर्थ त्यातून तुम्हाला काहीतरी सांगायचं किंवा सुचवायचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्वप्नांविषयी सांगणार आहोत ज्याचा अर्थ तुमच्यावर लक्ष्मीची कृपा बरसणार असा होतो. ते स्वप्न सांगतात की, तुमचे 'अच्छे दिन' सुरू होणार आहेत.

स्वप्नशास्त्रात सांगितले आहे की, काही स्वप्न हे आपल्याला आधीच सुचना देत असतात. आपल्या सोबत काही चांगले किंवा वाईट घडणार असेल तर ते आपल्याला आधीच सांगतात. आज आम्ही असेच स्वप्न सांगत आहोत ज्याचा स्वप्नशास्त्रात उल्लेख आहे.

स्वप्नात Savings करताना दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही पैसे वाचवताना किंवा बँकमध्ये जमा करताना बघत असाल तर हे शुभ संकेत आहेत. स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही कोणत्याही प्रकारे पैसे वाचवत आहात असे दिसले तर याचा अर्थ तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

याशिवाय जर तुम्हाला स्वप्नात कॉइन दिसले तर ते अशुभ मानले जाते याउलट जर नोटा दिसल्या तर तो शुभ संकेत समजला जातो.

स्वप्नात दात स्वच्छ करताना दिसणे

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दात स्वच्छ करताना दिसणे फार शुभ असते. जर स्वप्नात तुम्ही स्वतःला दात साफ करताना बघत असाल तर याचा अर्थ तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे.

लाल रंगाची साडी नेसलेली दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात कोणी लाल रंगाची साडी नेसलेली स्त्री दिसली तर याचा अर्थ तुम्ही मालामाल होणार आहात.

उंचावर चढताना बघणे

स्वप्नात उंचावर चढताना बघणे शुभ संकेत असतो. याचा अर्थ तुमचे प्रमोशन होणार आहे. तुमचा पगार वाढू शकतो.

स्वप्नात मंदिर दिसणे

स्वप्नात मंदिर दिसणे फार शुभ समजले जाते. याचा अर्थ भगवान कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर धनाचा वर्षाव करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT