Kojagiri Purnima 2023 esakal
संस्कृती

Kojagiri Purnima 2023 : कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त आणि तिथी

कोजागिरीची पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते.

Monika Lonkar –Kumbhar

Kojagiri Purnima 2023 : नवरात्रौत्सव आणि विजयादशमीची सांगता झाल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. कोजागिरी पौर्णिमा आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोजागिरीची पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते.

या वर्षी कोजागिरी पौर्णिमा शनिवारी २८ ऑक्टोबरला (शनिवारी) साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून ही ओळखली जाते. या दिवशी चंद्राचे टपोरे चांदणं आणि साजरे रूप पहायला मिळते. या दिवशी चंद्राचे सर्वात सुंदर रूप दिसते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

आजच्या लेखात आपण कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त आणि कोजागिरीचे महत्व जाणून घेणार आहोत.

कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त कधी ?

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. २८ ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे. ही पौर्णिमा २९ ऑक्टोबरला सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी संपेल.

परंतु, पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ आणि उदय तिथी दोन्ही २८ ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी येत असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबरलाच साजरी करण्यात येईल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ ही २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचा मुहूर्त कधी ?

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची आराधना आणि पूजा केली जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी ३ मुहूर्त आहेत. या तीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त हा रात्री ८:५२ ते १०:२९ पर्यंत आहे. त्यानंतरचा दुसरा मुहूर्त हा १०:२९ पासून ते १२:०५ पर्यंत आहे, त्यानंतर तिसरा मुहूर्त हा १२:०५ पासून ते १:४१ पर्यंत आहे.

या तिन्ही मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करू शकता. ही पूजा झाल्यानंतर लक्ष्मी देवीला दूध किंवा खीरचा प्रसाद दाखवला जातो. ही खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर, त्याचे सेवन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT