Mythological Stories Behind Raksha Bandhan sakal
संस्कृती

Raksha Bandhan Mythological Stories: रक्षाबंधनाशी संबंधित 'या' पौराणिक कथा तुम्ही ऐकल्या आहेत का? नसेल, तर नक्की वाचा!

Mythological Stories Behind Raksha Bandhan: रक्षाबंधन सणामागच्या या पौराणिक कथा तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या रक्षासूत्रामागचं आध्यात्मिक महत्त्व.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण आहे, जो यंदा ९ ऑगस्टला साजरा होईल.

  2. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधून त्याच्या रक्षणाची प्रार्थना करतात आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

  3. पौराणिक कथांनुसार रक्षाबंधनाची परंपरा केवळ माणसांपुरती नसून देव-देवतांमध्येही राखी बांधली जात होती.

Religious Significance of Rakhi in Hinduism: बहीण- भावांचं प्रेमाचं नातं साजरा करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा हा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. पण हा सण फक्त बहीण भावापर्यंतच मर्यादित नाही, तर देव-देवतांमध्ये देखील राखी बांधण्याची परंपरा होती असं पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे.

देवी लक्ष्मीने राजा बलिला बांधलेली राखी

असुरराज बलिची ख्याती दानशूर अशी होती. त्याने १०० यज्ञ पूर्ण करून स्वर्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सगळ्या देवतांच्या विनंतीनंतर भगवान विष्णूंनी वामन रूप धारण केलं आणि बलिकडे भिक्षा मागण्यासाठी गेले.

बलिकडे गेल्यावर वामनाने फक्त तीन पावलं जमीन मागितली. पहिल्या दोन पावलात त्याने आकाश आणि पाताळ व्यापलं आणि तिसरं पाऊल टाकण्यासाठी बलिने स्वतःचं डोकं समोर केलं. त्याच्या दानशूरतेने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला वर मागायला सांगितलं. बलिने पाताळात तुमचं कायमस्वरूपी वास्तव्य हवं असं मागितलं.

विष्णू पाताळात गेले, हे देवी लक्ष्मीला कळताच तिने ब्राह्मणीच्या वेशात बलिकडे जाऊन त्याला राखी बांधली. त्यानंतर, बंधुभावाने प्रेरित होऊन बलिने विष्णूंना बैकुंठात परत जाण्याची परवानगी दिली.

देवेंद्रला इंद्राणीने बांधले रक्षासूत्र

पुराणानुसार, एकदा देव आणि दैत्यांमध्ये भयंकर युद्ध सुरू होतं. या युद्धात देवेंद्र इंद्रावर दैत्यांचं वर्चस्व होतं. आपल्या पतीवर संकट आलं आहे हे पाहून इंद्राची पत्नी इंद्राणी अत्यंत चिंतेत पडली आणि उपाय विचारण्यासाठी ती बृहस्पतीकडे गेली.

गुरुंनी तिला एक पवित्र धागा मंत्रोच्चाराने पूजित करून इंद्राच्या हातात बांधायला सांगितला. इंद्राणीने तसं केल्यावर इंद्राला युद्धात विजय मिळाला. ह्याच घटनेपासून रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. पुढे ही परंपरा भाऊ-बहिणीच्या नात्याचा एक पवित्र सण म्हणून साजरी होऊ लागली.

द्रौपदी आणि श्रीकृष्णाचे बंधुत्वाचे नाते

महाभारतातील एक महत्त्वाची घटना सांगते की, एका सभेत शिशुपालाने श्रीकृष्णाचा अपमान केला होता. मात्र श्रीकृष्णाने आपल्या आजीला दिलेल्या वचनानुसार त्याचे १०० अपमान सहन केले. पण जेव्हा शिशुपालाने १०१व्या वेळेस त्याचा आपण केला तेव्हा सुदर्शन चक्राने त्याला ठार केलं.

त्याच वेळी श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली आणि रक्त येऊ लागलं. हे पाहून द्रौपदीने आपली साडी फाडून श्रीकृष्णाच्या हातावर बांधली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला हे ऋण योग्य वेळी फेडण्याचे वाचन दिले.

आणि आपल्या वाचनाला बांधील राहून जेव्हा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिची अब्रू वाचवली.

FAQs

१. रक्षाबंधन कधी साजरा केला जातो?
(When is Raksha Bandhan celebrated?)
रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार आहे.

२. रक्षाबंधन फक्त बहीण-भावाच्याच नात्यापुरतं मर्यादित आहे का?
(Is Raksha Bandhan limited only to the sibling relationship?)
नाही, रक्षाबंधनाचा अर्थ खूप व्यापक आहे. पौराणिक कथांनुसार देवी-देवतांनाही राखी बांधली गेली आहे, जसे की लक्ष्मीदेवीने बलिला राखी बांधली होती, इंद्राणीने इंद्राला रक्षासूत्र बांधले होते.

३. द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी का बांधली होती?
(Why did Draupadi tie a Rakhi to Lord Krishna?)
श्रीकृष्णाच्या हाताला शिशुपालाचा वध करताना जखम झाली होती. तेव्हा द्रौपदीने आपली साडी फाडून त्याच्या हातावर बांधली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्या रक्षणाचं वचन दिलं होतं.

४. रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली असे मानले जाते?
(How is the tradition of Raksha Bandhan believed to have started?)
मान्यता अशी आहे की इंद्राणीने युद्धात जाणाऱ्या इंद्राच्या हातात रक्षासूत्र बांधलं, ज्यामुळे त्याला विजय मिळाला. हीच परंपरा पुढे बहीण-भावाच्या नात्यात रुपांतरित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT