
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा याचा नातू आणि कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना शनिवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. रेवण्णा याच्यावर त्याच्या फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या एका मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. न्यायालयाला हे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे.