भारत-इंग्लंड यांच्यातली पाचवी कसोटी वादामुळे चर्चेत आली आहे
जो रूट व प्रसिद्ध कृष्णा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली
आकाश दीपनेही इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला डिवचले
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीत बरेच खटके उडालेले क्षण पाहायला मिळाले. इंग्लंडचा सर्वात शांत स्वभावाचा जो रूट आणि भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यातला वाद चर्चेचा विषय ठरला. रूटला डिवचण्यासाठी कृष्णाने शाब्दिक मारा सुरू केला होता आणि त्याला रूटकडूनही उत्तर मिळाले. हा वाद सुरू असताना लोकेश राहुलने ( KL RAHUL) उडी घेतली आणि थेट अम्पायर कुमार धर्मसेना यांच्यासोबत हुज्जत घातली. लोकेश राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.