मुंबई - विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी कांदिवलीमधील ‘सावली बार’ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचा खळबळजनक आरोप केला होता..यावरुन विरोधकांनी कदम आणि राज्य सरकारला लक्ष्य केले होते. यानंतर योगेश कदम यांनी ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबीयांसाठी ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे..कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला, त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द केला आहे. मंत्री कदम यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली असतानाच कदम यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. सावली बार आधी ऑर्केस्ट्रा परवाना असताना तिथे डान्सबार चालवत असल्याने कारवाई झाली होती. कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे..चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटता येत नाही. परवाना परत केला म्हणजे डान्स बारमध्ये अवैध काम सुरू होते, हे मान्य केले, तसेच आधी केवळ ऑर्केस्ट्रा चालतो, असे सांगत होते. या परवान्यावर डान्स बार चालवला गेला. अजून तपास सुरू आहे, गुन्हा घडला आहे, गृहराज्यमंत्रीच कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दया येत आहे. त्यांना सदर प्रकरणाबाबतची मी सगळी कागदपत्र दिली आहेत.- अनिल परब, शिवसेना, (ठाकरे).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.