Corona
Corona Sakal
देश

चार्टर्ड फ्लाइटमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा रूग्णालयातून पोबारा

निनाद कुलकर्णी

चंदीगड : इटलीहून अमृतसर विमानतळावर चार्टर्ड फ्लाइटमधून (Italy-punjab chartered flight 125 Passengers Found Covid Positive) आलेल्या 125 जणांना कोरोना झाल्याचे काल निष्पन्न झाले होते. त्यानंतर या सर्वांना रूग्णालयात भरती (Covid Positive Cases In India) करण्यात आले होते. त्यातील 13 रूग्णांनी आरोग्य अधिकाऱ्यांना गुंगारा देत रूग्णालयातून पोबारा केला आहे, अशी माहिती अमृतसरचे उपायुक्त गुरप्रीत सिंग खेडा यांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी इटलीहून 179 प्रवाशी एका चार्टर्ड विमानाने अमृतसर विमानतळावर उतरले होते. त्यानंतर त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात 125 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ( 13 Covid Positive Passengers runaway from Hospital In Amritsar)

दरम्यान, या कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आलेल्या प्रवाशांना त्यानंतर अमृतसर येथील गुरुनानक देव रुग्णालयात (Guru Nanak Dev Hospital Amritsar) दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर रूग्णालयातून पळ काढणाऱ्या प्रवाशाचे पासपोर्ट रद्द (Passport) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पळून गेलेले प्रवासी परत आले नाहीत, तर त्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रात (Photographs In News Paper) छापली जातील आणि त्यांच्याविरुद्ध महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवला जाईल, असे देखील खेडा यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, आम्ही साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, अशा परिस्थितीत प्रवाशांचे असे दुर्लक्ष अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

देशात १ लाख १७ हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून तिसरी लाट आल्याचंही म्हटलं जात आहे. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो ७.७४ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात ३ लाख ७१ हजार ३६३ सक्रीय रुग्ण आहेत. लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत १४९ कोटी ६६ लाख डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील २७ राज्यात ओमिक्रॉन पोहोचला आहे. एकूण ओमिक्रॉन बाधितांपैकी ११९९ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid 19 Active Cases In India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT