देश

ताजमहाल बघायला जा ; "हायब्रिड एरो' नौकेतून

पीटीआय

नवी दिल्ली : दिल्लीपासून आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना आता यमुना नदीतून जाणे हे केवळ स्वप्न राहणार नसून एका "हायब्रीड एरो' नौकेद्वारे हा प्रवास प्रत्यक्षात शक्‍य होणार आहे. यातील सारे अडथळे दूर करून आगामी 26 जानेवारीला ही जलवाहतूक सुरू करण्याचा निर्धार आहे, असे केंद्रीय परिवहन, महामार्ग व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यासाठी अशा बोटी बनविणाऱ्या रशियाच्या एका कंपनीशी गडकरींच्या मंत्रालयाने प्रत्यक्ष करारही केला आहे. 

जलमार्ग हे वाहतुकीचे सर्वांत किफायतशीर व प्रदूषणमुक्त साधन असून देशातील मोठ्या नद्यांमध्ये असे मार्ग विकसित करावे लागतील यावर गडकरींनी सुरवातीपासूनच जोर दिला. दिल्ली-आग्रा जलमार्गाची कल्पना त्यांनी 2016 च्या डिसेंबरमध्ये प्रथम मांडली. तेव्हा पक्षातील काही सहकाऱ्यांनी ही हास्यास्पद कल्पना असल्याचे टोमणे मारले होते. गडकरींनी त्यांच्याकडे लक्ष न देता "हायब्रीड एरो' नौकेबाबतचे प्रयत्न सुरू ठेवले व आता या सामंजस्य कराराने ते अंतिम टप्प्यात आले आहेत. सेंट पीटर्सबर्ग येथे बांधणी झालेली ही नौका लवकरच भारतात दाखल होणार आहे. 

येत्या 12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी-हल्दिया या गंगा जलवाहतुकीचे उद्‌घाटन होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. अलाहाबाद कुंभमेळ्याआधी वाराणसी-अलाहाबाद जलमार्ग प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. 

अशी असेल "एरोबोट' 

- भारत - रशियाचा एकत्र प्रकल्प 
- टोयोटो इंजिन असलेली ही नौका जमीन, हवा व पाणी या तिन्हीही आघाड्यांवर संचार करू शकेल. 
- नेहमीच्या नौकेपेक्षा दुप्पटीहून जास्त म्हणजे ताशी 170 किमीच्या वेगाने ती यमुनेतून आग्र्यापर्यंतचे अंतर कापेल. 
- नौकेची प्रवासी क्षमता 10 ते 22 प्रवासी असेल. 

पुणे-मुंबई इलेक्‍ट्रिक डबलडेकर बस? 

शहरांतील वाहतूक कोंडीचा व प्रदूषणाचा भीषण प्रश्‍न सोडविण्यासाठी इथेनॉल, मिथेनॉलचा इंधन म्हणून जास्तीत जास्त वापर करणे, विजेवर चालणारी इलेक्‍ट्रॉनिक वाहने वापरण्यास प्राधान्य देणे, मेट्रो गाड्या साध्या ब्रॉडगेज रेल्वे रूळांवरही चालू शकतील अशा तयार करणे यासारख्या उपायांविना गत्यंतर नसल्याचे नितीन गडकरी यांनी ठासून सांगितले.

पुणे-मुंबई, दिल्ली-जयपूर, दिल्ली-चंडीगड या मार्गांवर इलेक्‍ट्रॉनिक डबल डेकर बस चालविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. मुंबई, पुणे आदी शहरांत मिथेनॉल व इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या प्रत्येकी दहा बसेस लवकरच दाखल होणार असून त्यांची संख्या वाढविली जाईल, असे गडकरींनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT