18 hand grenade found in unclaimed condition in Ayodhya
18 hand grenade found in unclaimed condition in Ayodhya 18 hand grenade found in unclaimed condition in Ayodhya
देश

अयोध्या : बेवारस स्थितीत १८ हँडग्रेनेड सापडले; सुरक्षा यंत्रणा सतर्क

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : कँट परिसरात सोमवारी (ता. २७) दुपारी डझनहून अधिक हातबॉम्ब (हँडग्रेनेड) सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेवारस हँडग्रेनेड मिळाल्याच्या वृत्ताने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. तसेच परिसरात पाळत वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांना एकूण १८ हातबॉम्ब बेवारस स्थितीत सापडले. ते नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. (18 hand grenade found in unclaimed condition in Ayodhya)

निर्मलीकुंड येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात हे हँडग्रेनेड (hand grenade) सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हा परिसर लष्कराच्या फायरिंग रेंजपासून काही अंतरावर आहे. तेथे राहणाऱ्या काही लोकांना हे हँडग्रेनेड झुडपात आढळले. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि हँडग्रेनेड आपल्या ताब्यात घेतले. या हँडग्रेनेडमध्ये फ्यूज किंवा पिन नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हे हँडग्रेनेड लष्करी सरावाच्या वेळी सोडले गेले नाहीत आणि तिथेच पडले होते, असे म्हटले जात आहे. या दाव्यातून आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की, फायरिंग रेंजपासून अडीच किलोमीटर अंतरावरील झुडपात हे हँडग्रेनेड कसे पोहोचले? निर्मलीकुंड हा निवासी भाग आहे. तेथे हँडग्रेनेड (hand grenade) पोहोचण्याची शक्यता नाही. निर्मलीकुंड हा हायअलर्ट परिसर आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हँडग्रेनेड मिळाल्याच्या बातम्यांमुळे प्रशासनाचे हातपाय फुगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT