देश

विमानतळावर पकडले अर्धा किलोहून अधिकचे सोने

सकाळवृत्तसेवा

मुरगाव (गोवा) : दुबईतून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून 17 लाख रुपये किंमतीचे 580 ग्रॅम सोने गोव्याच्या कस्टमने दाबोळी विमानतळावर पकडले. याप्रकरणी एका विदेशी प्रवाशासह बंगळूर येथील एका व्यक्तीला कस्टमने ताब्यात घेतले.

सोन्याची तस्करी करण्यासाठी भारतातील दाबोळी विमानतळ सुरक्षित असल्याचे गृहीत धरून दुबई येथून येणाऱ्या विमानातून चोरट्या मार्गाने सोने घेऊन येण्याचे प्रकार वाढले आहेत. याची दखल घेऊन गोवा कस्टमने दाबोळी विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था तीव्र केली. दोन दिवसांपूर्वी दुबईला घेऊन जाणारे विदेशी चलन कस्टमने पकडले होते. त्यानंतर आज नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात 17 लाखांचे सोने पकडण्यात आले.

कस्टमने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या ए1-994या दुबई-गोवा-बंगळूर विमानातून आलेल्या एका विदेशी प्रवाशांकडे पाच सोन्याच्या बिस्किटं सापडली. त्याचे वजन 580 ग्राम होते. सदर प्रवाशाने शोपीसमध्ये लपवून हे सोने आणले होते. दाबोळी विमानतळावर पोचताच या विमानातून बंगळूरला जाण्यासाठी निघालेल्या एका भारतीय प्रवाशाकडे सदर सोन्याची बिस्किटं सोपविण्यात आले होते. त्यामुळे कस्टमने दोघांनाही ताब्यात घेतले.

गोव्याचे कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त टी. आर .गजलक्ष्मी यांच्या देखरेखीखाली विमानतळावरील कस्टमचे उपायुक्त डॉ.राघवेंद्र, सहाय्यक आयुक्त एन.जी.पटेल यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT