Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sakal
देश

पंजाबच्या सरशीनंतर 'आप'ची नजर हिमाचलवर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर, आम आदमी पार्टीने पक्षाचा मोर्चा शेजारील राज्य हिमाचल प्रदेशकडे वळवले असून, या वर्षाच्या अखेरीस हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजप (Congress & BJP) या दोघांनाही कंटाळलेल्या सामान्य माणसासाठी एक पर्याय बनण्याची इच्छा असल्याचे पक्षाने म्हटले आहे. (AAP Announce To Contest In Himachal Pradesh Assembly Election)

पंजाबमधील (Punjab) 'आप'चा विजय हा पक्षाचा कोणत्याही राज्यातील पहिला विजय असून, 2017 मध्येही आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली आणि काँग्रेसनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पंजाबमध्ये यावेळी काँग्रेसला आपली सत्ता वाचवता आली नाही, तर 117 पैकी केवळ 18 जागा जिंकता आल्या. दुसरीकडे आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकत मोठे यश मिळवले.

उत्तरेनंतर आप उतरणार दक्षिणेत; घेतला मोठा निर्णय

दिल्ली आणि पंजाबमधील घवघवीत यशानंतर आता आप आता दक्षिण भारतात मोठी सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे, अशी माहिती आपचे वरिष्ठ नेते सोमनाथ भारती यांनी दिली आहे. भारती म्हणाले की, पक्षाने दक्षिणेकडील राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी तेलंगणातून याची सुरुवात होणार आहे.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे. पंजाबमध्ये 'आप'च्या दणदणीत विजयानंतर दक्षिण भारतातील लोकांनी पक्षाबद्दल आस्था दाखवायला सुरुवात केली आहे असेदेखील भारती यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; एरर 502 काय आहे?

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT