Rahul Gandhi
Rahul GandhiTeam eSakal

पराभवानंतर काँग्रेस पुनर्रचनेच्या दिशेने? उद्या महत्त्वपूर्ण बैठक

CWC ची ही बैठक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या (Congress) सर्वोच्च समितीची रविवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. CWC ची ही बैठक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पाच राज्यांतील काँग्रेसचा दारूण पराभव पाहता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहेत, परंतु नेतृत्वाबाबत वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्या वेळेपूर्वी होऊ शकतात, असे मानले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Congress Working Committee (CWC) Meeting Held Tomorrow )

Rahul Gandhi
देवेंद्र फडणवीसांना नोटीस; उद्या पोलीस घरी जाऊन नोंदवणार जबाब

दरम्यान, काँग्रेसची ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा शुक्रवारी (दि.11) रात्री काँग्रेसमधील असंतुष्ट गट असलेल्या G-23 च्या काही नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या घरी झालेल्या बैठकीला मनीष तिवारी (Manish Tiwari) आणि इतर नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला फारसे काही करता आलेले नाही, तर पंजाबमध्ये खराब कामगिरीने सत्ता गमवावी लागली आहे. (Five State Assembly Election )

Rahul Gandhi
फडणवीसांना डेटा काढून देणारा तेजस मोरे आहे कोण?

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली, पण काँग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या. संपूर्ण यूपी निवडणुकीत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) फार कमी प्रचार केला होता. काँग्रेसच्या पराभवानंतर केरळचे खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधीच उच्च पातळीवर बदलांची मागणी केली आहे. मात्र, कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि डीके शिवकुमार यांनी गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त केला आहे. पराभवानंतर यूपी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

Rahul Gandhi
व्हॉइस ऑफ हिंद केस : ISIS ने भरतीसाठी चालवले होते ऑनलाईन कॅम्पेन

पंजाबमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव

पंजाबमध्ये (Punjab) गटबाजी आणि कलहात अडकलेल्या काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आम आदमी पक्षाने तेथे 92 जागा जिंकून मोठा दणका दिला आहे. या ठिकाणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे स्वत: निवडणुकीत पराभूत झाले असून, यूपीमध्ये काँग्रेस अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर, उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यताही एक्झिट पोलने वर्तवली होती. मात्र निकालानंतर काँग्रेसचा तेथे सुपडा साफ झाल्याचे पाहण्या मिळाले. गोव्यात आणि मणिपूरमध्येही काँग्रेसला विशेष यश मिळवता आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com