Crime
Crime Sakal
देश

Spanish shocker: झारखंडमध्ये आणखी एक गँगरेप; स्पॅनिश महिलेनंतर छत्तीसगडमधील महिलेवर तिघांचा अत्याचार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- झारखंडमधील दुमका येथे एका स्पॅनिश ट्रव्हल ब्लॉगरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच ऑर्केस्ट्रा टीममधील एका महिलेवर झारखंडमध्ये तीन व्यक्तींनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील ही घटना आहे.

सोमवारी याप्रकरणात पलामूच्या बिश्ररामपूर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी पीडितेच्या ओळखीचे असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तिसऱ्याचा शोध सुरु आहे.(After Spanish shocker Chhattisgarh orchestra troupe member assaulted in Jharkhand)

एका कार्यक्रमामध्ये नृत्य करण्यासाठी पीडितेला आरोपी गोलू कुमार याने बोलावले होते. कार्यक्रम रद्द झाल्यामुळे पीडिता गोलूच्या खोलीमध्येच राहिली, अशी माहिती बिश्ररामपूर एसडीपीओ राकेश सिंग यांनी दिली आहे. २१ वर्षीय पीडित मुलीने आरोप केलाय की, तिला खाण्यासाठी काही देण्यात आले होते. त्यानंतर ती बेशुद्ध पडली.

बेशुद्ध पडल्यानंतर तीन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.अजय कुमार, दिवाना कुमार असे इतर दोघा आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी गोलू फरार आहे. तिन्ही आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम ३२८ ( इजा पोहोचणे आणि कलम ३७६ (२) (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, देशात वाढत असलेले बलात्कारांचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम रद्द झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा टीमला गोलूने एका किरायाच्या खोलीमध्ये मुक्काम करण्यास सांगितले. रात्री आरोपींनी पीडितेला काही नशेचे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ज्या खोलीमध्ये अत्याचार झाला त्याला लागून असलेल्या खोलीमध्येच पीडितेची बहीण आणि ऑर्केस्ट्रा टीम होती. सकाळी जेव्हा पीडितेला घडला प्रकार कळला तेव्हा तिने सर्वात आधी बहिणीला याची माहिती दिली. त्यानंतर ऑर्केस्ट्रा टीमला माहिती देण्यात आली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT