Jharkhand News : मारण्याची भीती, पण देवाच्या कृपेने बचावले; पीडित स्पॅनिश महिलेकडून वेदनेचे कथन, 3 आरोपींना अटक

‘‘डोळ्यांदेखत पतीला झाडाला बांधले. आपण असहाय होतो. त्या नराधमांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. मला मारतील असे वाटले होते, पण देवाच्या कृपेने वाचले,’’ असे स्पेनच्या पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.
पीडित स्पॅनिश महिलेकडून वेदनेचे कथन
पीडित स्पॅनिश महिलेकडून वेदनेचे कथनSakal

दुमका : ‘‘डोळ्यांदेखत पतीला झाडाला बांधले. आपण असहाय होतो. त्या नराधमांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. मला मारतील असे वाटले होते, पण देवाच्या कृपेने वाचले,’’ असे स्पेनच्या पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.

दुचाकीवरून देशभ्रमंती करणाऱ्या स्पॅनिश महिलेवर झारखंडमध्ये शुक्रवारी रात्री सात जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. यावेळी आरोपींनी पीडितेला मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

पीडितेने एफआयआरमध्ये दुमकाजवळ घडलेला प्रकार कथन केला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी बोलण्याचा आवाज आला तेव्हा आम्ही दोघेही तंबू बाहेर आलो. दोघे गप्पा मारत उभे होते. त्यानंतर आणखी काही पाच ते सहा जण आले. त्या लोकांनी पतीसमवेत भांडण सुरू केले.

त्याला झाडाला बांधले आणि त्यानंतर तंबूत येऊन अत्याचार केला. यावेळी आरोपींनी तिला मारहाण केली आणि ३०० डॉलर आणि ११ हजार रुपये तसेच एक हिऱ्याची अंगठी लुटून नेली. आरोपींपैकी एक तीस वर्षाचा आणि अन्य २० ते २२ वयोगटातील होते. पीडितेने सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले, मला वाटले की ते मला ठार करतील, परंतु देवाच्या कृपेने मी जिवंत आहे.

या घटनेची माहिती पीडितेने स्पेनमधील मित्रांना दिली तसेच सोशल मीडियावर पोस्ट केली. याप्रकरणी दुमका पोलिसांनी रविवारी सायंकाळी तीन आरोपींना अटक केली असून अद्याप चार फरार आहेत. या प्रकाराची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. महिला आयोगाने देखील सविस्तर अहवाल मागितला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या ममता कुमारी यांनी पीडितेची भेट घेतली आणि माहिती घेतली. न्यायवैद्यक विभागाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती पतीसह बाईकवरून जग फिरण्यासाठी निघाले आहेत.

एक मार्च रोजी आपल्या दोन दुचाकीवरून कोलकता येथून नेपाळकडे निघाले होते. अंधार पडल्याने दुमका येथील कुरमाहाट जवळ थांबण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर तंबू लावला होता. मात्र बलात्काराची घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com