agnipath scheme navy chief admiral r hari kumar on agnipath scheme
agnipath scheme navy chief admiral r hari kumar on agnipath scheme  
देश

अग्निपथ योजनेला असा विरोध अपेक्षित नव्हता; नौदल प्रमुखांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान या नवीन भरती योजनेचे फायदे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना नौदल प्रमुख, अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या योजनेचे समर्थन केले आहे. (agnipath scheme navy chief admiral r hari kumar on agnipath scheme)

देशभरात या योजनेला विरोध होत असताना, नौदल प्रमुख म्हणाले की, अग्निपथ योजनेला असा विरोध अपेक्षित नव्हता. त्यांनी भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील सर्वात मोठे परिवर्तन म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अॅडमिरल कुमार म्हणाले की, त्यांनी अग्निपथ योजनेसाठी सुमारे दीड वर्ष काम केले आहे.

एएनआयशी बोलताना ते म्हणाले, मी योजना टीमचा एक भाग होतो आणि या योजनेवर सुमारे दीड वर्ष काम केले. ही एक परिवर्तन घडवून आणणारी योजना आहे आणि सशस्त्र दलांमध्ये अनेक प्रकारे बदल घडवून आणेल. अॅडमिरल कुमार म्हणाले, ही योजना देशासाठी आणि तरुणांसाठी फायदेशीर आहे, कारण ती तरूणांना अधिक संधी मिळवून देते.

ते पुढे म्हणाले की, मला वाटते की, या योजनेबद्दल चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे ही निदर्शने होत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, जेथे पूर्वी केवळ एका व्यक्तीला सैन्यदलात सेवा करण्याची संधी मिळायची, आता ती चार जणांना मिळेल. कमी कालावधीतील सेवेबाबत आपले मत मांडताना ते म्हणाले, याचे अनेक फायदे आहेत. अग्निवीरांना सशस्त्र सेवा करिअर म्हणून करायचे की, दुसरी नोकरी करायची हे ठरवण्याची संधी मिळेल.

योजनेला जोरदार विरोध होतोय

'अग्निपथ' या लष्करातील भरतीच्या नव्या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. शुक्रवारी देशातील किमान सात राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली. बिहार आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू झालेला विरोधाचा वणवा अनेक राज्यांमध्ये पोहोचला आहे. तेलंगणामध्ये शुक्रवारी विरोध आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर या निदर्शनात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरील या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे वृत्त आहे आणि तेथे जाळपोळ झाली, त्यानंतर पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. यादरम्यान एकाचा जीव गेला तर १५ हून अधिक जण जखमी झाले. अग्निपथ योजनेला विरोध केल्याने ३४० हून अधिक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये गाड्या जाळण्यात देखील आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात तूर्तास पाणीकपात नाही; महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण..

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

IPL 2024 प्लेऑफपूर्वी गंभीरच्या कोलकाताला मोठा धक्का, स्टार सलामीवीरने अचानक सोडली संघाची साथ

Rinku Singh: फ्लावर नहीं फायर है... केकेआरच्या रिंकू सिंगचा 'पुष्पा-पुष्पा' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

Melinda Gates: मेलिंडा गेट्स यांनी गेट्स फाऊंडेशनचा दिला राजीनामा; पुढील कामासाठी मिळणार 1,00,000 कोटी रुपये

SCROLL FOR NEXT