ajit dowal has big roll in solving india china dispute 
देश

चीनसोबत चर्चेसाठी भारताचा 'एकटा टायगर'; सैन्य मागे घेण्यास पाडलं भाग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- गलवान खोऱ्यातून चिनी सैन्यांना मागे घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वात प्रभावशाली कूटनैतिक हत्याराचा वापर केला होता. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यासाठी कामाला लावले होते. डोवाल यांनी रविवारी चीनचे त्यांचे समकक्ष वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे चर्चा केली होती.  त्यानंतर चीनने आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात  केली आहे. त्यामुळे डोवाल यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत आहे.

...म्हणून आम्ही गलवान खोऱ्यातून माघार घेतोय; चीनने दिली कबुली
भारताने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.  59 चिनी अॅप्सवर भारत सरकारकडून बंदी आणण्यात आली होती. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले होते. त्यामुळे सैन्य मागे घेण्यासाठी चीनवर दबाव वाढला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये गलवान खोऱ्यातील सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 1.5 किलोमीटरपर्यंत माघार घेतली असल्याची माहिती हाती आली आहे. सध्या गलवान खोऱ्यातून सैन्य मागे घेण्याची प्रकिया सुरु झाली आहे. पुढील काळात pp-4,pp-15, फिंगर स्पिंग आणि फिंगर एरिया या भागातून सैन्य मागे घेतले जाईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 

डोभाल यांनी वांग यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. लडाख सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेण्यामागे ही चर्चा असल्याचं सांगितलं जातंय. यापुढेही डोभाल आणि वांग यांच्यामध्ये चर्चा सुरुच राहणार आहे. भविष्याच दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय लष्कर आणि राजनैतिक स्तारावरही ही चर्चा सुरु राहणार आहे. तसेच द्विपक्षीय प्रोटोकॉलचे दोन्ही देशांकडून पालन होईल याबाबत काळजी घेतली जाणार आहे. 

राज्यात शेती सिंचन व्यवस्थापनात आर्थिक धोरणाचा अभाव? 
दरम्यान, पूर्वी लडाखच्या गलवान भागात उभय देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 43 जवान मारले गेल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावर बैठकी होत होत्या. मात्र, दोघांमधील तणाव निवळत नव्हता. दोन्ही देशांनी सीमा भागात सैनिकांनी जमवाजमव सुरु केली होती. जवळजवळ 30 हजार दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद केव्हा मिटतो, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. सोमवारी एक चांगली बातमी आली. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंत माघार घेतली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाद निवळेल अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT