KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

IPL 2026, KKR vs SRH Marathi Cricket News : आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने इडन गार्डन्सवर आपला दबदबा दाखवत कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. या पराभवासह KKR ला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली आहे.
Sunrisers Hyderabad defeat Kolkata Knight Riders at Eden Gardens

Sunrisers Hyderabad defeat Kolkata Knight Riders at Eden Gardens

esakal

Updated on

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Marathi Update News: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिच क्लासन व नितीश कुमार रेड्डी यांच्या दमदार फलंदाजीनंतर SRH च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. KKR ला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. अंगकृश रघुवंशीने अर्धशतक झळकावले खरे, परंतु इतरांनी निराश केले. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेंडूचा वेग कमी ठेवून अचूक मारा करून कोलकाताला हतबल केले आणि विजयासह IPL 2026 POINT TABLE मध्ये सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली. कोलकाता १० व्या क्रमांकावर घसरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com