Allahabad High Court on Taj Mahal Sakal
देश

Taj Mahal Case : 'उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये...', HC ने सुनावले खडेबोल

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहलच्या (Taj Mahal Case) २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटाकरले आहे. आज तुम्ही ताजमहालाच्या खोल्यांची तपासणी करण्याची मागणी करत आहात. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जायची मागणी कराल. ताजमहल कोणी बनवला ते आधी शोधा. विद्यापीठात जाऊन अभ्यास करा, पीएचडी करा आणि त्यानंतर न्यायालयात या, अशा कडक शब्दात न्यायालयानं सुनावलं आहे.

उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. इतिहासात एम. ए करा. नेट जेआरएफ करून संशोधनासाठी विषय निवडा. मग कोणत्याही संस्थेने संशोधन करण्यापासून रोखले तर आमच्याकडे या. तुमच्यानुसार इतिहास बदलणार नाही. आता इतिहास तुमच्या म्हणण्याप्रमाणे बदलायचा का? असे खडेबोल न्यायालयाने सुनावले आहे.

अनेक खोल्या बंद असल्याची माहिती मिळाली असून सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे, असं याचिकाकर्त्याने म्हटलं. तसेच कोर्टात झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते रजनीश सिंह यांचे वकील म्हणाले की, देशातील नागरिकांना ताजमहालचे सत्य जाणून घ्यायचे आहे. ताजमहालमध्ये काही लपवले गेले असेल तर ते जनतेला कळले पाहिजे. औरंगजेबने वडिलांना लिहिलेले पत्र मी पाहिले आहे, असा युक्तीवाद वकिलाने केला.

ताजमहल शहाजहानने बांधला नाही यावर तुमचा विश्वास आहे का? तो कोणी बांधला किंवा ताजमहलचे वय काय याचा निर्णय देण्यासाठी आपण इथे आलो आहोत का? तुमचा विश्वास असलेली ऐतिहासिक तथ्ये तुम्ही आम्हाला सांगणार का?. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेपुरते मर्यादित राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मला यावर काही निर्णय दाखवायचे आहेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, ही याचिका माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे आणि आता तुम्ही हे सर्व करत आहात. तुम्ही या विषयावर माझ्या घरी या आणि आम्ही त्यावर वाद घालू पण कोर्टात नाही. यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याला दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT