Amit_Shah.jpg
Amit_Shah.jpg 
देश

Loksabha 2019 : अमित शहांच्या नातीने नाकारली भाजपची टोपी (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

गांधीनगर : भाजप अध्यक्ष अमित शहा हे आज (शनिवार) गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी घडलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अमित शहा यांची नात भाजपची टोपी घालण्यास नकार देत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.

अमित शहा यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अमित शहा आणि त्यांच्या नातीमध्ये घडलेला प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

घरी आल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या नातीला उचलून घेतले. नातीने पांढऱ्या रंगाची पोटी घातली होती. पण अमित शहा तिची टोपी काढून तिला भाजपची टोपी घालत होते. परंतु वारंवार प्रयत्न करुनही नातीने ती टोपी घालण्यास नकार दिला. अखेर तिने भाजपची टोपी नाकारुन आवडती पांढरी टोपीच घातली. अमित शहा आणि त्यांच्या नातीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अमित शाह आज गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शहा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश सिंह बादल, रामविलास पासवान यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT