Amit Shah high level meeting for review as 4 Jammu Kashmir terror attacks in a Week marathi news  
देश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले! केंद्रीय गृहमंऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत घेतला परिस्थितीचा आढावा

शिवखोरी मंदिराकडून कटराकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर गत आठवड्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर खात्याचे संचालक तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, आगामी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यासह केंद्रीय पोलिस दलांचे प्रमुख आणि जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक उपस्थित होते.

शिवखोरी मंदिराकडून कटराकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर गत आठवड्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 9 भाविक मृत्यूमुखी पडले होते तर चाळीसपेक्षा जास्त भाविक जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी अन्य ठिकाणीही हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांनी आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. चालू महिन्याच्या अखेरीस अमरनाथ यात्रा सुरु होणार आहे. त्यामुळे गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांना सावध रहावे लागणार आहे.

जम्मू काश्मीरमधील स्थितीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या गुरुवारी बैठक घेतली होती. स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या प्राणाचे रक्षण करण्यास लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यावेळी पंतप्रधानांनी दिले होते. अमरनाथ यात्रा यंदा 29 जून रोजी सुरु होणार असून ती 19 ऑगस्टपर्यंत ती चालेल. बालटाल आणि पहलगाम या यात्रेच्या दोन्ही मार्गावरील सुरक्षा मजबूत करणे तसेच भाविकांना आवश्यक त्या सोयी—सुविधा देण्याचे निर्देश अमित शहा यांनी आजच्या बैठकीदरम्यान दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT