Dhoni
Dhoni 
देश

सर्वोत्तम 'फिनिशर'ला भेटले 'गेम चेंजर'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क फॉर समर्थन’उपक्रमांतर्गत पक्षाचे गेम चेंजर म्हणून ओळख असलेले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी भारताचा सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. 

शहा यांनी धोनीची भेट घेत केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला आणि सोबत सरकारने केलेल्या कामांची माहिती असलेली एक पुस्तिकाही भेट दिली. यावेळी शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या भेटीनंतर अमित शाह यांनी ट्विटरद्वारे या भेटीबाबत सांगताना म्हटले आहे, की ‘संपर्क फॉर समर्थन’उपक्रमांतर्गत जागतिक क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट फिनिशरची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी गेल्या चार वर्षांमध्ये राबवलेल्या उपक्रमांबाबत त्यांना माहिती दिली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘संपर्क फॉर समर्थन’ हा उपक्रम सुरु केला असून या अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीची भेट घेऊन सरकारने केलेल्या कामकाजाची माहिती दिली जात आहे. यापूर्वी अमित शाह यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योगपती रतन टाटा, गायिका लता मंगेशकर, घटना तज्ज्ञ सुभाष कश्यप, स्टार बॅडमिंटन सायना नेहवाल, योग गुरु बाबा रामदेव, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचीही भेट घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT