देश

'शहा हे नाव भारतीय नाही; नाव बदला'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आडनाव हे भारतीय नाही. शहा हा पार्शियन शब्द आहे, त्यामुळे शहांचे आडनाव बदलण्याची मागणी इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी केली आहे. नाव बदलण्याची सुरुवात भाजपने पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून करायला हवी. त्यांच्या नावातील 'शहा' हा शब्द संस्कृत नसून पर्शियन असल्यानं त्यांनी यामध्ये बदल करायला हवा, असे हबीब यांनी म्हटले आहे.  

त्याचबरोबर, गुजरात हे नावसुध्दा भारतीय नाही. गुजरात हे नावसुद्धा पर्शियन आहे. तेसुद्धा भाजपने बदलायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने सध्या हिंदुत्ववादी धोरण स्वीकारत देशभरात शहरांची आणि ठिकाणांची नावे बदलण्याचा धडाका लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना हबीब म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदु विचारसरणीप्रमाणे भाजपशासित राज्यात शहरांची नावं बदलण्यात येत आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने अनेक शहरांची आणि ठिकाणांची नावे बदलली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबादचे 'प्रयागराज' आणि फैजाबादचे 'अयोध्या' असे नामकरण केल्यानंतर आता आग्रा शहराचे नाव बदलून 'अग्रवन' करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT