BJP MP lallu singh
BJP MP lallu singh  
देश

VIDEO: भाजपच्या आणखी एका खासदाराच्या संविधानावरील वक्तव्यामुळे वादाची ठिणगी; काँग्रेसने व्हिडिओ केला शेअर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजपच्या आणखी एका नेत्याने संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपचे फैजाबादमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार लल्लू सिंह यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.

देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे, पण संविधानात दुरुस्ती करण्यासाठी किंवा संविधान बदलण्यासाठी दोन तृतियांश जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा नियमही बदलावा लागेल आणि संविधान देखील बदलावं लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केलंय. (Another BJP MP remarks on the Constitution spark controversy Congress shared the video)

काँग्रेसकडून टीका

काँग्रेसने या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे नेता पवन खेरा यांनी यासंदर्भात लल्लू सिंह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणालेत की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, स्वत: बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत. पण, आता अयोध्येतील भाजपचे विद्यमान खासदार लल्लू सिंह उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. ४०० जागांची जनतेला मागणी करत आहेत. मोदी यांना मनापासून माफ करु शकतील का? असा सवाल पवन खेरा यांनी केलाय.

भाजप नेत्यांकडून याआधीही वादग्रस्त वक्तव्य

कर्नाटकातील भाजप नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देखील संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संविधान बदलण्यासाठी ४०० पेक्षा जास्त जागांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपकडून हेगडे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपचे आणखी एक नेते ज्योती मिर्धा यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपने त्यांना राजस्थानच्या नागौरमधून तिकीट दिलं आहे.

फैजाबाद लोकसभा जागेवरुन लल्लू सिंह भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांना निवडणूक लढणार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. १९ एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल लागेल. (Lok Sabha Election)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT