Shrimp News
Shrimp News sakal
देश

Shrimp News : भारतीय कोळंबीत आढळली प्रतिजैविके

सकाळ वृत्तसेवा

वॉशिग्टंन/नवी दिल्ली : भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोळंबीत प्रतिजैविके आढळल्याने अन्न सुरक्षिततेच्या मुद्द्यावर तेथे रोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्राप्त अहवालानंतर अमेरिकन सिनेटर बील कॅसिडी यांनी अमेरिकी ग्राहकांचे हित जोपसण्याच्या मुद्यावर तेथील व्यापारी प्रतिनिधी संघाकडे आपले आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.

तसेच या निर्यातीत भारताकडून बेकायदेशीर वेठबिगारी मजुरांचा वापर करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय कोळंबीविरोधात सातत्याने अमेरिकेकडून गेल्या काही वर्षांपासून भूमिका घेतल्या जात आहेत. यात प्रामुख्याने ‘व्यापार युद्धा’चा संशय अधिक येत असल्याचे मत भारतीय अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

आउटलॉ ओशन प्रोजेक्ट्स या संस्थेने भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोळंबीच्या अन्न सुरक्षिततेच्या संदर्भात सावधानतेचा इशारा देणारा अहवाल दिला आहे. यानंतर सिनेटर कॅसिडी यांनी अमेरिकेतील व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकन व्यापार प्रतिनिधी संघाकडे आपले आक्षेप नोंदवत सुधारणांची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

सिनेटर कॅसिडी म्हणाले, ‘‘भारतीय कोळंबी उद्योगात सक्तीची मजूरपद्धती अवलंबिली जाते. त्याचबरोबर या कोळंबींमध्ये बेकायदेशीर प्रतिजैविके आढळली आहेत. लुझियाना कोळंबी शेजारी भारतीय कोळंबीची विक्री का करू नये, याचे उत्तर या अहवालाने दिले आहे. अशावेळी अमेरिकी व्यापार प्रतिनिधी संघाने अमेरिकेतील ग्राहकांचे हीत प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT