file photo
file photo 
देश

लष्कराती कॅप्टनला मारहाण झाल्याचे उघड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील द्वारका या सुखवस्तू भागामध्ये पाच गुंडांनी भारतीय लष्करातील कॅप्टन हुद्यावरील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याचे उघड झाले. कॅ. विकास यादव असे या अधिकाऱ्याचे नाव असून, सर्व गुंडांना अटक झाली आहे.

कॅ. यादव हे त्यांची पत्नी, बहीण, मेहुणे आणि मुलांसह 13 मे रोजी द्वारका भागातील एका हॉटेलमधून भोजन करून बाहेर पडले असताना एक स्कॉर्पिओ गाडी त्यांच्याजवळ थांबली आणि गाडीतील गुंडांनी यादव यांच्याबरोबरील महिलांशी असभ्य भाषेत बोलण्यास सुरवात केली. यादव आणि त्यांच्या मेहुण्याने जाब विचारला असता गाडीतून पाच जण बाहेर आले आणि त्यांनी यादव यांना मारहाण करण्यास सुरवात केली. डोक्‍यात काचेची बाटलीही फोडल्याने यादव हे जखमी झाले. पोलिसांत तक्रार केल्यास महिलांवर बलात्कार करण्याची धमकीही या गुंडांनी दिली. हे गुंड पळून जात एक जण गाडीबाहेरच राहिला. यादव यांनी दोन किलोमीटर पळत जाऊन त्याला पकडले. महंमद अर्शद अली हाशमी असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्याकडून काढून घेतलेल्या माहितीवरून इतर सर्वांनाही अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT