Arvind Kejriwal Delayed By Roadshow
Arvind Kejriwal Delayed By Roadshow 
देश

रोड शोमुळे केजरीवाल अर्ज भरण्यापासून वंचित

पीटीआय

नवी दिल्ली  - दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला रंग भरू लागला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले खरे, परंतु वेळेत न पोचल्याने आता उद्या (ता. २१) अर्ज भरणार आहेत. वाल्मीकी मंदिर येथे पोचल्यानंतर रोड शोला सुरवात केली. मात्र, त्यांचा ताफ्याला विलंब झाला. 

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, रोड शोमुळे नियोजित दुपारी ३.३० पर्यंत निवडणूक अधिकारी कार्यालयापर्यंत पोचू शकले नाहीत. रोड शोला प्रचंड गर्दी झाल्याने त्यांना वेळेत जाता आले नाही. तत्पूर्वी त्यांनी निवासस्थानी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसच्या नेत्या दिवंगत शीला दीक्षित यांचा राहिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध अद्याप भाजप आणि काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT