IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

MS Dhoni Fan Breaks Up With Girlfriend : सीएसकेच्या चाहत्यांसाठी धोनी देवापेक्षा कमी नाही.
MS Dhoni Fan Breaks Up With Girlfriend News Marathi
MS Dhoni Fan Breaks Up With Girlfriend News Marathisakal

MS Dhoni Fan Breaks Up With Girlfriend : आयपीएल 2024 मधील 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये सीएसकेने हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला. या विजयासह सीएसकेने प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या या सामन्यात धोनी मैदानात उतरला. तो फक्त दोन चेंडू खेळला आणि पाच धावा केल्या. धोनी मैदानात येत होता त्यावेळी त्याच्या नावाचा जयघोष सुरू होता. संपूर्ण मैदानात फक्त धोनी... धोनी... हाच आवाज येत होता.

खरंतर सीएसकेच्या चाहत्यांसाठी धोनी देवापेक्षा कमी नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. दरम्यान एका चाहत्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MS Dhoni Fan Breaks Up With Girlfriend News Marathi
प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने पोस्टरसह लिहिले होते की, 'मी माझ्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केले कारण तिच्या नावावर 7 अक्षरे नाहीत.' धोनीच्या जर्सीचा क्रमांक सात आहे, याशिवाय त्याचा वाढदिवस 7 जुलैला आहे. आणि त्याच्या नावावर सात अक्षरे नसल्यामुळे फॅनने त्याच्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केल्याचे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MS Dhoni Fan Breaks Up With Girlfriend News Marathi
New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

चेन्नईच्या विजयामुळे गुणतालिकेत थोडा बदल झाला आहे. या विजयासह सीएसकेने पॉइंट टेबलमध्ये आता तिसऱ्या स्थानावर आला आहे, तर हैदराबाद चौथ्या स्थानावर घसरला आहे. आतापर्यंत राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरले आहे. उर्वरित तीन जागांसाठी केकेआर, लखनौ, दिल्ली, हैदराबाद आणि गुजरात या संघांमध्ये लढत होणार आहे. मात्र, आरसीबी, मुंबई आणि पंजाबसारखे संघ इतर संघांचा खेळ खराब करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com