देश

अल्वरच्या घटनेचे राज्यसभेत पडसाद

वृत्तसंस्था

गृहमंत्र्यांना निवेदनाची सूचना

नवी दिल्ली: राजस्थानातील अल्वर येथे गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी एका पशु व्यावसायिकाची हत्या केल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील वातावरण गरम झाले. ही घटना प्रत्यक्ष घडलेलीच नाही असा युक्तिवाद संसदीय कामकाज राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी करताच विरोधक प्रचंड संतापले. त्यावर उपसभापती पी. जे. कुरियन यांनी, या घटनेबाबत गृहमंत्र्यांना सांगून या प्रकरणी सभागृहात आपले निवेदन सादर करावे अशी सूचना संसदीय कामकाज राज्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना केली.

कॉंग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी "न्यूयॉर्क टाइम्स'नेही या घटनेची दखल घेतली असल्याचे सांगून त्या बातमीचे कात्रणही दाखविले. मिस्त्री यांनी सांगितले, की राजस्थानात कथित गोरक्षक टोळ्यांना सरकार वा पोलिसांचाही धाक राहिलेला नाही. अशाच घटना गुजरात व मध्य प्रदेशातही घडत आहेत.

त्यावर नक्वी म्हणाले, की अराजक व गुंडगिरीला भाजप सरकारचा पाठिंबा नाही. मात्र हे सभागृह गोहत्येला पाठिंबा देत असल्याचा संदेश देशभरात जाऊ नये. मिस्त्री सांगतात ती घटना प्रत्यक्षात घडलेलीच नाही. त्यावर आझाद यांनी, या सरकारच्या संवेदनाहीनतेचा हा कळस आहे असे सांगितले. उच्च न्यायालय, देशभरातील माध्यमे व "न्यूयॉर्क टाइम्स'पर्यंत जी बातमी जाते ती सरकार धुडाकवते हा कमालीचा कोडगेपणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर विरोधी पक्ष सदस्य वेलकडे येऊ लागताच कुरियन यांनी तातडीने हस्तक्षेप करून गृहमंत्र्यांना सभागृहासमोर निवेदन देण्याच्या सूचना दिल्या.

संघर्ष यात्रा राज्यसभेत
महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीवरून विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा विषय रजनी पाटील यानी मांडला. त्या म्हणाल्या, की उत्तर प्रदेशातील शेतकरी व महाराष्ट्रातील शेतकरी यांचे दुःख एकच आहे. मात्र सरकार या दोन्हींत भेदभाव करते हे अन्यायाकारक आहे. भाजप सरकार निवडणुकांच्या तोंडावर त्या त्या राज्यांना गाजर दाखविते. महाराष्ट्रात आता कोणतीही निवडणूक नाही; त्यामुळे राज्यातील शेतकरी मरत असतानाही त्यांना कर्जमुक्ती मिळू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT