Exclusive: भाजपाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर? विरोधकांच्या आरोपांवर PM मोदींचा पलटवार; म्हणाले, 'मी क्लिनचिट दिली नाही'

PM Narendra Modi: "कोणत्याही प्रकरणातील आरोपीला जामिन मिळाला असे, सुटका झाली असेल किंवा शिक्षा झाली असेल तर याचा निर्णयही न्यायालयानेच घेतला आहे. याच्याशी माझा कोणताही संबंध नाही."
PM Modi On Investigative Agencies
PM Modi On Investigative AgenciesEsakal

PM Narendra Modi Latest News

देशात पंतप्रधाinन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार 2014 मध्ये पहिल्यांदा सत्तेत आले. त्यानंतर 2019 मध्येही भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला.

पण भाजपच्या या दहा वर्षांच्या कालावधीत अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना क्लिन चिट देण्यात आल्याचा आणि तपाससंस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप देशातील सर्वच विरोधी पक्ष करत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'एपी ग्लोबाले' व 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यात नुकतीच दिल्लीत भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपवर तपाससंस्थेचा गैरवापर केला जात असलेल्या आरोपावरही उतर दिले.

तपास संस्थांच्या गैरवापराच्या आरोपावर पंतप्रधान म्हणाले, "या तपाससंस्था आमच्या हाती सत्ता येण्यापूर्वीपासून अस्तित्त्वात आहेत. तसेच त्यांच्याकडे असलेले अधिकारही आधिपासूनच आहेत. गेल्या काही वर्षांत या संस्था पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असल्याने याची विरोधकांना अडचण होत आहे."

PM Modi On Investigative Agencies
PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

"देशातली तपास संस्थांची स्थापना ज्या कामांसाठी झाली आहे, तेच काम या तपास संस्था करत आहेत. त्यांच्यावर आमचा कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. याचबरोबर क्लिन चिटबाबत बोलायचे झाल्यास, ज्या लोकांना क्लिन चिट मिळाल्या आहेत त्यांना न्यायालयाने दिल्या आहेत. यापैकी कोणालाही मी क्लिन चिट दिलेली नाही," या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लिन चिटच्या आरोपांना उत्तर दिले.

PM Modi On Investigative Agencies
PM Modi Exclusive: महाराष्ट्रात भाजपाच्या जागा कमी होणार? विरोधकांच्या दाव्यावर मोदींचा षटकार

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, इथून पुढच्या काळातही त्यांचा भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहणार आहे. ते म्हणाले, कोणत्याही प्रकरणातील आरोपीला जामिन मिळाला असे, सुटका झाली असेल किंवा शिक्षा झाली असेल तर याचा निर्णयही न्यायालयानेच घेतला आहे. याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. तसेच माझ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सुरू असलेला लढा कायम राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजित पवार यांच्यातील चर्चेचा वेचक भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com