देश

राफेलवर कोठेही बोललेलो नाही- पर्रीकर

वृत्तसंस्था

पणजी- राफेल प्रकरणावर कोठेही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय परराष्ट्रमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. ते म्हणाले की, राफलेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाच्या खोटेपणाचा खुलासा झाला आहे. यानंतर काँग्रेस पक्ष पुर्णपणे हडबडून गेला असून, दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा ऑडिओ जाणीवपूर्वक मोडतोड करून व्हायरल केला आहे.

पर्रीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या किंवा इतर कोणत्याही बैठकीत ऑडिओ क्लिपमध्ये सांगण्यात आलेल्या मुद्यांवर आपण बोललेलो नाही. अशा प्रकारची चर्चा कुठल्याही बैठकीत किंवा मंत्रीमंडळात झाली नसल्याचेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. पर्रीकर यांनी व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपबाबत स्पष्टीकरण दिले.
 

दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर मला बदनाम करण्यासाठी कट रचला आहे. राफेल प्रकरणासंदर्भात मी कोणाकडेच कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नसून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केलेला आरोप खोटा आहे. असल्याचे स्पष्टीकरणही गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले होते. त्यांनी म्हटले होते की, सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्‍लिपमधधील आवाजाची तपासणी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT