Pawan Kalyan and Hemamalini
Pawan Kalyan and Hemamalini Sakal
देश

Ayodhya Ram Mandir : राममंदिरासाठी सेलिब्रिटिंचा हातभार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - अयोध्यानगरीत रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहेत. राममंदिर उभारणीचे गेल्या अनेक वर्षे स्वप्न साकार झाले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत एक हजार १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून ते पूर्णत्वास येण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज आहे. राममंदिराच्या उभारणीत अनेकांनी मदत केली आहे. यात सामान्य जनतेपासून बॉलिवूडमधील सेलिब्रिटिनींही हातभार लागला. अक्षय कुमार, अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण यांच्यासह अनेकांनी देणगी दिली आहे.

अक्षय कुमार - राममंदिरासाठी दान देण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ अक्षय कुमारने जानेवारी २०२१ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओसह त्याने लिहिले होते, की ‘अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाले आहे. मी त्यासाठी दान केले आहे. तुम्हीही कराल, अशी अपेक्षा आहे.’ मात्र किती दान केले आहे, हे अक्षयने सांगितले नाही.

पवन कल्याण - एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याणने मंदिरासाठी ३० कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याच्या खासगी कर्मचाऱ्यांनीही ११ हजार रुपये दान केले आहे.

मुकेश खन्ना - मंदिर उभारण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये ट्विटरवर दिले होती.

हेमामालिनी - भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनीही राममंदिरासाठी गुप्तदान केले आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त त्यांनी अयोध्येत नुकतेच रामायणाचे नाट्य सादरीकरण केले.

अनुपम खेर - अयोध्येला ऑक्टोबर २०२३ मध्ये भेट दिल्यानंतर अनुपम खेर यांनी मंदिराच्या बांधकाम परिसराची छायाचित्रे शेअर केली होती. मंदिर बांधणीसाठी त्यांनी विटांची भेट दिली असल्याचे सांगितले होते.

मनोज जोशी - ‘चाणक्य’ मालिकेत भूमिका साकारणारे मनोज जोशी यांनीही गुप्तदान केले आहे.

गुरमित चौधरी - दूरचित्रवाणी वाहिनीवर २००८ मध्ये प्रसारित झालेल्या ‘रामायण’ मालिकेत श्रीराम झालेला गुरमित चौधरी याने राममंदिरासाठी दान केल्याची माहिती त्याने जानेवारी २०२१ मध्ये सोशल मीडियावर दिली होती.

प्रणिता सुभाष - दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.

मंदिरापर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली - अयोध्येत राममंदिराची प्रतीक्षा ही अनेक शतकांची होती. बाबरी मशिदीच्या उभारणीनंतर साधारण साडेतीनशे वर्षांनंतर मंदिर उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला. पंधराव्या दशकापासूनचा इतिहास...

१५२८ - मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधली

१८८५ - महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून वादग्रस्त इमारतीच्या बाहेर छत बांधण्याची परवानगी मागितली आहे.न्यायालयाने याचिका फेटाळली

१९४९ - वादग्रस्त भागाच्या बाहेर मध्यवर्ती घुमटाखाली रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या

१ फेब्रुवारी १९८६ - स्थानिक न्यायालयाने सरकारला हिंदू भाविकांसाठी जागा खुली करण्याचा आदेश

१४ ऑगस्ट १९८९ - अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त भागासंदर्भात ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला

६ डिसेंबर १९९२ - राम जन्मभूमीच्या जागेवर १६ व्या शतकात बाबरी मशीद बांधली गेली, असा दावा करीत हिंदू करसेवकांनी ती पाडली

३ एप्रिल १९९३ - वादग्रस्त भागात केंद्राकडून जमीन संपादित करण्यासाठी ‘काही क्षेत्राचे अधिग्रहण कायदा’ मंजूर

एप्रिल २००२ - अलाहाबाद उच्च न्यायालयात वादग्रस्त जागेची मालकी कोणाची आहे हे ठरवण्यासाठी सुनावणी सुरू झाली

३० सप्‍टेंबर २०१० - उच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा मतांनी वादग्रस्त जमिनीचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या तिघांमध्ये वाटप केले

९ मे २०११ - अयोध्येतील जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली

जानेवारी २०१९ : सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली

६ ऑगस्ट २०१९ : सर्वोच्च न्यायालयाने जमिनीच्या वादावर दैनंदिन सुनावणी सुरू

१६ ऑक्टोबर २०१९ - सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी समाप्त. निर्णय राखून ठेवला

९ नोव्हेंबर २०१९ - अयोध्येतील पूर्ण २.७७ एकर वादग्रस्त जमीन रामलल्लाला मंजूर करण्याचा व ताबा केंद्र सरकारकडे राहील, असा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचेही सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला निर्देश

५ फेब्रुवारी २०२० - अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा

५ ऑगस्ट २०२० - पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी

२२ जानेवारी २०२४ - अयोध्येतील मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT