lalu prasad yadav
lalu prasad yadav 
देश

लालूंच्या मुक्ततेसाठी 'आझादी पत्र'; पित्याच्या सुटेकसाठी मुलीची विशेष मोहीम

सकाळवृत्तसेवा

पाटना : राजदचे सुप्रीमो लालू  प्रसाद यादव यांच्या मुलीने आपल्या पित्याच्या सुटकेसाठी एक नवी मोहीम सुरु केली आहे. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्या वडिलांच्या सुटकेची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर या सुटकेची मोहीम एक आंदोलन बनावे, यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.

मुलगी रोहिणीची सुटकेसाठी मोहिम
लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्यने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांच्या सुटकेसाठी मागणी केली आहे. यासाठी तिने त्यांना पत्र लिहलंय. रोहिणी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हे पत्र ट्विट केलं आहे. सोबत लिहलंय की, देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना एक पत्र. गरीबांचे देव आदरणीय श्री लालू प्रसाद यादव यांच्यासाठी 'आझादी पत्र'. या मोहिमेत सहभागी व्हा आणि आपल्या नेत्याच्या मुक्ततेसाठी आवाहन करा... ज्यांनी आपल्याला ताकद दिली आज त्यांच्यासाठी ताकद बनण्याची ही वेळ आहे. आम्ही आणि तुम्ही मोठ्या साहेबांची ताकद आहोत.

रोहिणी यांनी या ट्विटमध्ये आवाहन केलं आहे की, लालूंच्या चाहत्यांनी पाटण्यातील राजदच्या ऑफिसवर तीन वाजता यावं आणि राजदचे सुप्रीमो लालूंच्या सुटकेसाठी आवाहन करावं. रोहिणी यांचं हे ट्विट लालूंचे मोठे सुपुत्र तेजप्रताप यादव यांनी देखील ट्विट केलं आहे. 

तब्येतीत थोडीशी सुधारणा
राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. मात्र, अद्याप त्यांची तब्येत धोक्याच्या बाहेर नाहीये. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून एम्सचे डायरेक्टर देखील त्यांना पाहण्यासाठी पोहोचले होते. चारा घोटाळ्यातील आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव यांना तब्येत बिघडल्यावर शनिवारी संध्याकाळीच दिल्लीतील एम्समध्ये शिफ्ट केलं गेलं. अद्याप तरी एम्सकडून त्यांच्या तब्येतीबाबत कसलीही माहिती देण्यात आली नाहीये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT