baba ka dhaba
baba ka dhaba 
देश

जीवे मारण्याची धमकी मिळतेय म्हणत पुन्हा ढसाढसा रडले 'बाबा का ढाबा'वाले बाबा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बाबा का ढाबा चे बाबा कांता प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी बाबा कांता प्रसाद यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्यानं माझ्यासाठी प्रार्थना करा असं म्हटलं आहे. कांता प्रसाद यांनी म्हटलं की, मला घरातून बाहेर पडण्याची बीती वाटत आहे. सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून ढाबा जाळण्यात येईल अशीही धमकी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद यांना मिळालेली प्रसिद्धी सर्वांनाच माहिती आहे. एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर त्यांची प्रचंड लोकप्रियता वाढली आणि बाबा का ढाबाला प्रसिद्धी मिळाली. त्यांना अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे काही लोकांच्या डोळ्यात हे खुपत असल्याचं त्यांचे म्हणणे आहे. याआधी त्यांचे कोणाशी भांडण नव्हते मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत फोनवर किंवा ढाब्याजवळ येऊन धमक्या देण्याचे प्रकार सुरु झाल्याचं कांता प्रसाद यांनी म्हटलं आहे. 

ढाबा जाळून देण्याची धमकी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. सतत येणाऱ्या धमक्याबाबत बाबा कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी अद्याप पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतलेला नाही. मात्र तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

धमक्या येत असल्यानं बाबा कांता प्रसाद यांचे वकील प्रेम जोशी पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. वकिलांनीच पोलिसांत याची तक्रा दिली. त्यांनी म्हटलं की, यामागे युट्यूबर गौरव वासनचा हात असल्याची शंका आहे. मात्र याबाबत बाबा कांता प्रसाद यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार बाबांनी पोलिसात 11 डिसेंबरला दिली होती. 

दरम्यान, बाबा कांता प्रसाद यांचा व्हिडिओ करणाऱा युट्यूबर गौरव वासनने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गौरव वासनने म्हटलं की, बाबा कांता प्रसाद यांची कोणीतरी दिशाभूल करत आहेत. माझ्यावर जाणीवपूर्वक सूड उगवला जात आहे. पोलिस याप्रकरणी सत्य शोधून काढतील असा विश्वासही गौरव वासनने व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT