

Maharashtra Sugar Industry Gets Relief Plan as Government Proposes 4000 Crore Soft Loan Before Crushing Season
sakal
-सदानंद पाटील
मुंबई : प्रतिकूल हवामान, उसाच्या उत्पादनातील घट आणि सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च यामुळे महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे चार हजार कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ (सवलतीच्या दरातील कर्ज) देण्याची तयारी दर्शवली आहे. सहकार विभागाने तयार केलेला हा प्रस्ताव सध्या अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.