हिंडलगा : कारागृहाच्या भिंतीवर उभारलेले तारेचे कुंपण.
हिंडलगा : कारागृहाच्या भिंतीवर उभारलेले तारेचे कुंपण. 
देश

हिंडलगा कारागृह बनले अधिक अभेद्य

अमृत वेताळ

बेळगाव - हिंडलगा आणि बळ्ळारी ही दोन मध्यवर्ती कारागृहे राज्यात अतिसुरक्षित मानली जातात. पण, मध्यतंरी काही उपकारागृहे आणि मध्यवर्ती कारागृहातून कैदी फरार झाले होते. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून हिंडलगा कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर विशिष्ट प्रकारच्या तारेचे कुंपण घातले आहे.

या कुंपणाचे वैशिष्ट्य एखाद्या कैद्याने भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला अन्‌ त्याला कुंपणाची तार थोडी जरी लागली तर तो कैदी काही मिनिटांत बेशुद्ध होऊ शकतो. 
कारागृहाच्या सुरक्षेसाठी मध्यवर्ती कारागृहासह उपकारागृहांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत आहे. हिंडलगा कारागृहातील कैद्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. काही महिन्यांपुर्वी चिक्‍कोडी उपकारागृहाची भिंत फोडून कैद्यांनी पलायन केले होते. गतवर्षी राज्यातील विविध कारागृहांतून १० कैदी फारार झाल्याची नोंद आहे.

राज्यभरातील सर्व कारागृहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तारेच्या कुंपणाने बंदिस्त केली आहेत. बंगळूरमधील परप्पन अग्रहार कारागृहातून सायको शंकर या अट्टल गुन्हेगाराने कारागृहाची भिंत पार करून पलायन केले होते. त्याला पुन्हा अटक झाली तरी कैदी फरार होऊ नयेत, म्हणून कारागृह प्रशासनाने पावले उचलली. त्याच पार्श्‍वभूमीवर हिंडलगा कारागृहाभोवतीही तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. 

हिंडलगा कारागृह २४ एकर क्षेत्रावर पसरलेले आहे. कारागृहात ११०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या याठिकाणी ७२० कैदी आहेत. जमिनीपासून कमी उंची असलेल्या संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. हे विशिष्ट प्रकारचे कुंपण कोलकात्याहून आणले आहे. पलायनासाठी तार कापण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटू शकणार नाही. तारेच्या कुंपणात एक विशिष्ट प्रकारचे रसायन मिश्रित केले आहे. भिंतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना तारेचा स्पर्श होऊन शरीराला इजा झाली तर तारेतील ते रसायन त्याच्या रक्‍तात भिनून संबंधित कैदी काही वेळातच बेशुद्ध पडू शकतो. त्यामुळे, हिंडलगा कारागृहातून पलायन करणे आता सोपे राहिलेले नाही. 

हिंडलगा मध्यवर्ती कारागृह कैद्यांना बंदिस्त ठेवण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. मात्र, राज्यभरातील विविध कारागृहांतून कैदी फरारही होत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून कैदी पसार होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, तारेचे कुंपण घालण्यात आले आहे.
- टी. पी. शेष, 

अधीक्षक, हिंडलगा कारागृह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT