Mehdi Masroor Biswas
Mehdi Masroor Biswas esakal
देश

Terrorist Organization : 'इसिस'च्या दहशतवाद्याला दहा वर्षांचा तुरुंगवास; एनआयए न्यायालयाचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

दहशतवादी मेहदी याला अटक केल्याच्या दिवसापासून बंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहामध्ये कैदेत ठेवण्यात आले आहे.

बंगळूर : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (Isis) या संस्थेचा ट्विटर अकाउंट मॅनेजर मेहदी मसरूर बिस्वास (Mehdi Masroor Biswas) याला विशेष राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ‘इसिस’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या (Terrorist Organization) अबू बकर बगदादीच्या नेतृत्वाखाली सीरियात दहशतवादी कारवाया होत होत्या.

दरम्यान, मेहदी हा मूळचा पश्चिम बंगालचा (West Bengal) असून, तो जलाहळ्ळीच्या सिद्धार्थनगरमधील अपार्टमेंटमध्ये राहत होता. येथून २०१२ मध्ये त्याने ‘इसिस’च्या वतीने ‘शम्मीविटनेस ट्विटर’ हे खाते उघडले होते. दहशतवाद्यांनी चालवलेला रक्तपात आणि दहशतवादी ट्विट करून तरुणांना ‘इसिस’ संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता.

माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर सीसीबी अधिकाऱ्यांनी १३ डिसेंबर २०१४ रोजी जलाहळ्ळी सिद्धार्थनगर येथे मेहदीला अटक केली. गंगामनागुडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी एसीपी एम. के. तम्मय्या यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. याप्रकरणी लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती. ट्विटरकडून कागदपत्रे गोळा करून ३७ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.

पोलिसांची बाजू सरकारी वकील बिक्कन्ननावर यांनी मांडली. तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीसी) एसीपी बी. आर. वेणुगोपाल यांच्या पथकाने न्यायालयात पुरावे सादर केले. प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने आरोपी मेहदीला दहा वर्षांचा तुरुंगवास आणि २.१५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

दहशतवादी मेहदी याला अटक केल्याच्या दिवसापासून बंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहामध्ये कैदेत ठेवण्यात आले आहे. आता न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याने यापूर्वी ९ वर्षे १ महिना तुरुंगात काढला आहे. शिक्षेची उर्वरित ११ महिने त्याला कारागृहात काढावी लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT