Ola Uber Rickshaw
Ola Uber Rickshaw Sakal
देश

Karnataka : Ola, Uber ला मोठा झटका; जास्त शुल्क आकारल्याने रिक्षा बंद करणार

सकाळ डिजिटल टीम

ओला, उबेर सारख्या सर्विसेसने अधिक शुल्क आकारल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाने अशा काही प्रमुख अॅप्सची बंगळुरूमधली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने अशाप्रकारे जास्त शुल्क आकारण्याला बेकायदेशीर म्हटलं आहे आणि त्यांना नोटीस बजावली आहे.

कर्नाटक सरकारने ओला, उबेर आणि रॅपिडो अशा सेवा पुरवणाऱ्या अॅप्सला तीनच दिवसांमध्ये आपली ऑटोसेवा बंद करण्यास सांगितलं आहे. काही प्रवाशांनी कर्नाटक सरकारकडे याची तक्रार केली होती. ओला आणि उबेर दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतर असले तरीही किमान 100 रुपये आकारतात. शहरातील ऑटोचे किमान भाडे पहिल्या 2 किलोमीटरसाठी 30 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

परिवहन आयुक्त टीएचएम कुमार यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे ऑन-डिमांड ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी एग्रीगेटर्स नियम या कंपन्यांना ऑटो-रिक्षा सेवा चालवण्याची परवानगी देत ​नाहीत कारण ती फक्त टॅक्सीपुरती मर्यादित होती. "सरकारी नियमांचे उल्लंघन करून हे ओला, उबेर ऑटोरिक्षा सेवा देत आहेत. तसेच, सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर ग्राहकांकडून आकारले जात असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे," असे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT